शारदीय नवरात्र २०२५: नवरात्रोत्सव हा शक्तीची उपासना आणि श्रद्धेचा उत्सव मानला जातो. या नऊ दिवसांमध्ये देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. नवरात्रोत्सवाचा समारोप कन्या पूजन आणि दसऱ्याने होतो. परंपरेनुसार, आठव्या आणि नवव्या दिवशी नऊ लहान मुली आणि एका मुलाला जेवण दिले जाते आणि त्यांचे आशीर्वाद मागितले जातात. यालाच कन्या पूजन किंवा कन्या भोज असे म्हणतात. मुली म्हणजे दुर्गेचे रूप असे मानले जाते. या वर्षी कन्या पूजन ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर या दिवशी मुहूर्तावर केले जाईल. काही विशिष्ट परिस्थितीत कन्या पूजन टाळावे असेही म्हटले जाते. कोणत्या परिस्थितीत कन्या पूजन करू नये हे जाणून घेऊ…

घरात मृत्यू झाल्यास

जर कुटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला तर शोक काळात घर अपवित्र मानले जाते. शोक काळात घर अपवित्र मानले जाते आणि कोणतेही शुभ किंवा धार्मिक कार्य केले जात नाही. नवरात्रात उपवास चालू असला तरी, कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाला असेल, तर कन्या पूजन करू नये. धार्मिक श्रद्धेनुसार, शुद्धीकरण विधी आणि हवन होईपर्यंत पूजा आणि कन्या पूजन करणे टाळावे.

घरी मुलीचा जन्म झाल्यास म्हणजेच सोयर

ज्याप्रकारे मृत्यूनंतर शोक पाळला जातो म्हणजेच सुतक पाळले जाते, त्याचप्रकारे बाळाचा जन्म झाल्यानंतरही जन्माचं सोयर पाळलं जातं. नवीन बाळाच्या जन्मानंतर काही काळासाठी पूजा आणि विधी करण्यास मनाई आहे. या काळात धार्मिक कार्ये टाळावीत. शुद्धीकरण विधी हवन होईपर्यंत कन्या पूजन किंवा कोणतेही मोठे विधी करू नयेत.

मासिक पाळीच्या वेळी मुलींची पूजा करू नये

धार्मिक श्रद्धेनुसार, मासिक पाळीच्या काळात महिलांनी उपवास, पूजा किंवा कोणतेही धार्मिक कार्य करू नये. जर नवरात्रीच्या उपवासात एखाद्या महिलेला मासिक पाळी सुरू झाली, तर तिने या काळात देवीची पूजा किंवा कन्या पूजन टाळावे.

(Disclaimer- वरील माहिती केवळ श्रद्धा आणि ज्योतिषशास्त्रानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. लोकसत्ता कोणत्याही माहितीचे समर्थन करत नाही.)