Parenting tips: एक चांगली आणि यशस्वी व्यक्ती होण्यासाठी, मुलांच्या आयुष्यात पालकांची खूप मोठी भूमिका असते. आई-वडिलांच्या वागण्या-बोलण्यातून, सभोवतालचे वातावरण आणि संस्कारामधून मुलाचे व्यक्तिमत्त्व घडत असते. मुले केवळ त्यांचे पालक त्यांना जे शिकवतात त्यातूनच नव्हे तर त्यांचे आसपास घडणाऱ्या गोष्टी, आई-वडीलांचे वागणे, कुटुंबातील इतर सदस्यांशी असलेले त्यांचे नाते, घरातील वातावरण आणि त्यांच्या विचारसरणीतूनही बरेच काही शिकतात. अशा परिस्थितीत आदर्श पालकत्वासाठी या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा लोक त्यांच्या स्वतःच्या पालकत्वाच्या पद्धतीबाबत शंका घेतात की, ते मुलांना चांगले संस्कार देत आहेत की नाही? असा प्रश्न त्यांना पडचो. म्हणून येथे काही एका आदर्श पालकाचे गुण कोणते आहेत ते सांगत आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदर्श पालकांना असतात या सवयी


एक चांगला श्रोता व्हा

तुमचे मूल तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगत असेल आणि तुम्ही ते शांतपणे ऐकत असाला तर हे एका चांगले पालक असण्याचे लक्षण आहे. जेव्हा तुम्ही त्यांच्या भावना गांभीर्याने ऐकता तेव्हा त्यांना सुरक्षित वाटते आणि ते तुमच्यापासून काहीही लपवत नाही.

आलिंगन द्या
जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना मिठी मारता तेव्हा त्यांच्या शरीरात ऑक्सिटोसिन नावाचा एक चांगला संप्रेरक बाहेर पडतो, ज्यामुळे ते नेहमी आनंदी आणि सकारात्मक राहतात. संधी मिळाली की तुम्ही तुमच्या मुलांना प्रेम आणि आलिंगन देत असाल तर हे चांगल्या पालकत्वाचे लक्षण आहे.

हेही वाचा – सलग तीन दिवसांच्या उपवासाचा तुमच्या शरीरावर काय होईल परिणाम?

सर्जनशील व्हा

जर तुम्ही मुलांना सर्व काही सर्जनशील पद्धतीने करण्यास प्रोत्साहित केले तर ते उत्कृष्ट पालकत्वाचे लक्षण आहे. उदाहरणार्थ, तुमचे मुलं दूध पीत नसेल तर त्याला मिल्कशेक करून प्यायला देणे. त्याला डाळ आवडत नाही, त्याचे पराठे बनवून खाऊ घालणे.

मजा मस्करी करा

जर तुम्ही तुमच्या मुलांना काही शिकवण्यासाठी सर्व गोष्टीने मजेशीर पद्धतीने सांगत असाल आणि त्यांच्या चुका सुधारण्यासाठी किंवा त्यांना चुकीच्या गोष्टी करण्यापासून रोखण्यासाठी विनोदी शैली वापरत असाल तर हे एक उत्तम पालकाचे लक्षण मानले जाते.

हेही वाचा – Swelling Remedies: हिवाळ्यात हातापायांची बोटे सुजल्यामुळे त्रस्त आहात? मग हे सोपे घरगुती उपाय करून पाहा, मिळेल आराम

एक उत्तम शेफ असणे

जर आपण मुलांना पोषण आणि चव लक्षात घेऊन आहार तयार करत असेल आणि मुलांना हिरव्या भाज्या, फळे असा कोणताही आरोग्यदायी आहार घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेत असेल तर हे देखील चांगल्या पालकत्वाचे लक्षण आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Signs shows that you have excellent parenting skills parenting tips excellent parent snk