Home Remedies For Swelling: हिवाळा सुरू झाला की शरीरात अनेक प्रकारे बदल होत असतात. विशेषत: ज्या लोकांना थंडी आणि उष्णतेचा त्रास होतो, त्यांची हाता-पायाची बोटे सुजतात. थंड हवामानात, लोक हिवाळ्यात हातआणि पायाची बोटे सूजण्याची तक्रार करतात. यावेळी, हातापायांची बोटे केवळ सूजच नाही तर जळजळ आणि खाज सुटण्याबरोबरच वेदनाही होतात. अशावेळी काही घरगुती उपाय करून तुम्ही या सूज आणि वेदनापासून मुक्ती मिळवू शकता. हिवाळ्यात हातापायांची बोटे सुजतात तेव्हा काय करावे ते जाणून घेऊया.

हातापायांच्या बोटांची सूज दूर करण्यासाठी टिप्स

  • ऑलिव्हचे तेलाला कोमट गरम करून त्यात हळस टाकून एकत्र कराय. ती सुकल्यावर बोटांवर लावा. काही वेळ तसेच राहू द्या. मग कोमट पाण्याने धूवून टाका त्यामुळे तुम्हाला झटपट आराम मिळेल.
  • लसूण सोलून मोहरीच्या तेलात थोडा वेळ शिजवून घ्या. हे तेल थोडे कोमट केल्यानंतर बोटांना लावा आणि काही वेळ तसेच राहू द्या. काही वेळाने बोटांना हलक्या हाताने मसाज करा. असे दिवसातून दोन ते तीन वेळा करा, लवकरच सूज आणि वेदना कमी होतील.
  • लिंबाचा रस देखील यासाठी प्रभावी ठरू शकतो. गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळा आणि त्यात काही वेळ बोटे बुडवून ठेवा. पाणी थंड झाल्यावर बोटे काढून धुवा. यामुळे तुम्हाला लवकरच वेदना आणि सूज यापासून आराम मिळेल.

हेही वाचा – स्वयंपाक करताना लक्षात ठेवा तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ सोप्या टिप्स! तुमचा वेळ आणि कष्ट वाचवा, आरोग्याचीही घ्या काळजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय करू नये

१. हातापायांची बोटे सुजलेली असल्यास, हीटरसमोर कधीही शेकू नये. यामुळे तुमच्या वेदना वाढू शकतात. त्यामुळे हे करू नका.
२. हिवाळ्यात जमिनीवर अनवाणी पायाने चालू नका. असे केल्याने थंडीमुळे आणखी बोटे सुजतात.
३. थंडीच्या ऋतूमध्ये शक्य असल्यास, लोकरीचे मोजे घाला आणि चप्पल हलकी असावी.