Best Home Remedies for Termites: एकदा घरातील जुन्या फर्निचर, दरवाजा आणि खिडक्यांना वाळवी लागली की ती लवकर कमी होत नाही. ही वाळवी एवढी भयानक असते की, पूर्ण लाकडी फर्निचर पोखरुन त्याचे नुकसान करते. वाळवीमुळे लाकडी फर्निचर, दरवाजे, खिडक्या हळूहळू आतून पोकळं होतात, शेवटी त्यांना बदलावे लागते. यावर एक उपाय म्हणून वाळवी लागल्याचे कळताच ही वाळवी वेळीच रोखली पाहिजे. त्यामुळेच आज आम्ही अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही घरात लाकडी वस्तूंना लागलेली वाळवी कायमची नष्ट करून टाकाल.
वाळवी म्हणजे नक्की काय?
वाळवी (Termites) व्हाईट अॅन्ट या नावानेही ओळखली जाते. वाळवी लहान मुंगीच्या आकाराचा एक कीडा असून त्यांना अंडाकृती चार पंख असतात. या पंखाचा उपयोग त्यांना झुंडीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपले खाद्य शोधण्यासाठी उड्डाण करण्याकरिता होतो. या सामूहिक गटागटाने राहतात. त्यांच्या ‘राणी’ सोडून बाकीच्या मुंग्यांचे दोन वर्ग असतात.
वाळवी दूर करण्यासाठी प्रभावी टिप्स
व्हिनेगर आणि लिंबाचा रस
घरातील फर्निचरला वाळवी लागू नये यासाठी व्हिनेगर आणि लिंबाचा रस हा देखील एक चांगला उपाय आहे. यासाठी एका स्प्रे बाटलीत व्हिनेगर आणि लिंबाचा रस समप्रमाणात घ्या, आता ते फर्निचरवर स्प्रे करा, यामुळे वाळवीचे प्रमाण कमी होईल.
कडुलिंबाचे तेल वापरा
लाकडी वस्तूंना लागलेली वाळवी रोखायची असेल तर तुम्ही कडुलिंबाचे तेल वापरु शकता. लाकडी फर्निचरवर ज्या ठिकाणी वाळवी लागली असेल त्या ठिकाणी कडुलिंबाचे तेल योग्यरित्या लावा. तुम्ही हे तेल बाटलीमध्ये भरुन फर्निचरवर स्प्रे देखील करु शकता. कडुलिंबाच्या तेलात अँटी बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात ज्यामुळे वाळवी नाहीशी होते.
मीठाचा वापर
फर्निचर वाळवी मुक्त करण्यासाठी तुम्ही मीठ देखील वापरू शकता. मिठात थोडे पाणी किंवा लिंबाचा रस मिसळा आणि त्याचे जाडसर द्रावण तयार करुन लाकडी वस्तूंवर कापसाच्या बोळ्याने लावा, असे महिन्यातून काही दिवस रोज करा, अशाने फर्निचरवरील वाळवी मोठ्या प्रमाणात कमी होईल.
लवंगाचे तेल
घरातील लाकडी फर्निचरवरील वाळवी घालवण्यासाठी तुम्ही लवंग तेल देखील वापरू शकता. ते वापरणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्ही एका कप पाण्यात १० थेंब लवंग तेल टाका. आता हे तयार द्रावण फर्निचरवर वाळवी लागलेल्या ठिकाणी लावा, असे काही दिवस केल्यास फर्निचरवरील वाळवी नाहीशी होऊ शकेल.