Tips To Get Rid Of Wrinkles​: या युगात जिथे प्रत्येकाला सुंदर आणि तरुण दिसायचे आहे, अशा अनेक महिला आहेत ज्या त्यांच्या चेहऱ्याची त्वचा तजेलदार करण्यासाठी खूप लक्ष देतात. बारीक रेषा, सैल त्वचा आणि सुरकुत्या ही सर्व वृद्धत्वाची चिन्हे आहेत. त्वचेवर वृद्धत्व दिसणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. अकाली वृद्धत्वामुळे तुमचे वय अधिक दिसून येते आणि ते चांगल्या आरोग्याचे लक्षण नसते. जर तुमचे वय ३० वर्षे असेल आणि तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या असतील तर तुम्ही काही टिप्स अवलंबून त्यावर मात करू शकता. चला जाणून घेऊया कसे?

त्वचा सैल होण्याची कारणे
वाढत्या वयानुसार, त्वचेमधली चमक कमी होते. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. चेहऱ्यावरील ऊती आणि मलस टोन गमावतात आणि त्वचा सैल होतात. पण, पावडर किंवा द्रव स्वरूपात कोलेजन सप्लीमेंट उपलब्ध आहेत, जे दैनंदिन आहारामध्ये पुरेसे कोलेजन पातळी राखण्यासाठी आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी मदतीचे ठरू शकतात. पण तो कायमचा इलाज नाही. पण जर तुम्ही पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन केले तर ते त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.

आणखी वाचा : Fashion Tips: अशा पद्धतीने साडीसोबत बेल्ट कॅरी करू नका, त्यामुळे लूक खराब होऊ शकतो

सुरकुत्या कशा कमी करायच्या ?

ऑलिव तेल
हे तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.त्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि ई सारखे अँटी-ऑक्सिडंट असतात. याने नियमितपणे चेहऱ्याला मसाज करा. यामुळे तुमची त्वचा मॉइश्चरायझेशन राहील आणि सुरकुत्या येणार नाहीत.

केळी
केळी तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यास मदत करू शकते. कारण केळीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे सुरकुत्या आणि त्वचेच्या रेषा कमी होतात. यासाठी तुम्ही आठवड्यातून दोनदा केळीच्या पल्पची पेस्ट बनवून २० मिनिटे चेहऱ्यावर लावू शकता. त्यानंतर ते धुवून काढा.

व्हिटॅमिन ई कॅप्सूल
एक चमचा कोरफड जेलमध्ये हे कॅप्सूल मिसळा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. ३० मिनिटांनी चेहरा धुवून काढा. असे केल्याने तुम्ही चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करू शकता.