skin care tips in summer: उन्हाळा येताच त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. टॅनिंगसह इतर अनेक समस्या उष्णतेमुळे वर तोंड काढतात. अशातच उन्हाळ्यात घाम येणे आणि घामामुळे त्वचेला खाज आणि दुर्गंधी येणे सामान्य गोष्ट आहे. मात्र घामामुळे त्वचा काळी पडत असेल तर, त्याचा परिणाम आपल्या व्यक्तीमत्वावर होतो.खरं तर उन्हाळ्यात खूप घाम येतो आणि हा घाम सुकल्यावर मानेवर घाण साचते आणि त्यामुळे मान दुरून काळी दिसते. त्यामुळे तुमच्या शरीराचे सौंदर्य कमी होते. अशावेळी चेहरा गोरा दिसतो आणि मान खूप काळी दिसायला लागते.पुष्कळ वेळा लोक साबणाने किंवा पाण्याने घासून काढण्याचा प्रयत्न करतात पण मान लाल होते आणि ही खूण जात नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकजण यासाठी वेगवेगळी अनेक प्रकारची उत्पादने वापरतात, मात्र ही उत्पादने तुमच्या त्वचेला हानी पोहोचवू शकतात. अशा परिस्थितीत मान स्वच्छ करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करुन पाहू शकता. चला जाणून घेऊया उन्हाळ्यात घामामुळे मानेवरील काळे डाग घालवण्यासाठी काय करावे.

या घरगुती उपायांनी मानेभोवतीची काळी वर्तुळे कमी होतील

बेकिंग सोडा, लिंबू

बेकिंग सोडा, लिंबू आणि नारळाचे तेल मिसळून तयार केलेली पेस्ट लावल्याने काळ्या मानेची समस्या दूर होईल. मात्र मानेवर किंवा त्याच्या जवळपासच्या त्वचेवर जखम असल्यास बेकिंग सोडा लावू नये. अन्यथा त्याचा त्रास होऊ शकतो. एका बाऊलमध्ये १ चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यात अर्था चमचा दही मिसळून पेस्ट तयार करा. दह्यात लॅक्टिक अ‍ॅसिड असतं, ज्याने त्वचा उजळण्यात मदत मिळते. दह्याऐवजी पाणीही वापरू शकता.

सायडर व्हिनेगर

ऍपल सायडर व्हिनेगरमुळेही मानेचा काळेपणा कमी होतो. तुम्हाला फक्त दोन चमचे ऍपल सायडर व्हिनेगर घ्यायचे आहे आणि ते चार चमचे पाण्यात चांगले मिसळायचे आहे. नंतर कापसाच्या साहाय्याने मानेच्या काळेपणावर लावा, १० मिनिटांनी धुवा. त्याचा परिणाम लवकरच दिसून येईल.

हेही वाचा – Summer health tips: उन्हाळ्यात नाकातून रक्त का येतं? घाबरू नका; हे घरगुती उपाय ट्राय करा

बटाट्याचा रस

बटाट्याचा रस देखील मानेभोवतीची काळी वर्तुळे कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. यात ब्लीचिंग गुणधर्म आहेत ज्यामुळे मानेची त्वचा चमकदार होते. हे करण्यासाठी, तुम्हाला बटाटा किसून घ्यावा लागेल, नंतर त्याचा रस पिळून घ्या आणि कापसाच्या साहाय्याने गळ्याभोवती लावा. असे काही दिवस केल्याने मानेवरील काळेपणा नक्कीच दूर होईल.

बेसन आणि हळद

मानेचा काळेपणा दूर करण्यासाठी दोन चमचे बेसनामध्ये एक चमचा हळद, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि गुलाबपाणी मिसळा. ही पेस्ट नीट मिसळा आणि नंतर मानेवर लावा. ही पेस्ट मानेवर १५ मिनिटे राहू द्या. १५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने मान धुवा. ही पेस्ट आठवड्यातून दोनदा लावल्याने मानेचा काळपटपणा दूर होईल

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Skin care tips get rid of dark neck due to sweating srk