What Is The Best Skincare For Pimples : उन्हाळा सुरू झाला की, आपल्यातील प्रत्येकालाच कंटाळा येतो. उन्हाच्या तडाख्याने अंगाची होणारी लाही, घामाने भिजलेले अंग, बाहेरचे रणरणते ऊन, सतत लागणारी तहान, तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर येणाऱ्या मुरमांचा त्रास आदी अनेक गोष्टींच्या त्रासामुळे आपल्याला उन्हाळा नकोस वाटतो. तर, उन्हाळ्यात जास्त प्रमाणात मुरमे येणे ही एक सामान्य समस्या आहे. वाढती उष्णता, घाम, धूळ ही मुरमे येण्याची प्रमुख कारणे आहेत. या सर्व गोष्टी एकत्रितपणे त्वचेवरील छिद्रे बंद करतात, ज्यामुळे मुरमे येतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उन्हाळ्यातही तुमची त्वचा स्वच्छ राहावी, असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी स्वतःच्या काही सवयी बदलाव्या लागतील.

१. वारंवार चेहरा धुऊ नका (Stop Washing Your Face Frequently)

उन्हाळ्यात थंड वाटण्यासाठी आपण वारंवार चेहरा धुतो. उन्हाळ्यात वारंवार चेहरा धुण्याने त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते; ज्यामुळे त्वचेत जास्त तेल तयार होते. सौम्य फेस वॉशने दिवसातून दोनदा चेहरा धुणे पुरेसे आहे.

२. जेल-आधारित उत्पादने (Gel Based Products)

तुम्ही प्रत्येक ऋतूमध्ये त्वचेसाठी विशेष उत्पादने वापरता. पण, उन्हाळ्यात जड क्रीम किंवा तेलकट उत्पादने त्वचेची छिद्रे बंद करू शकतात. त्याऐवजी कोरफड जेल किंवा पाण्यावर आधारित मॉइश्चरायझर वापरा, ज्यामुळे त्वचा हलकी आणि ताजी राहील.

३. योग्य सनस्क्रीन लावा (Don’t Ignore Sunscreen)

उन्हाळ्यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सनस्क्रीन. पण, सनस्क्रीनमुळे त्वचेचे नुकसानसुद्धा होऊ शकते, ज्यामुळे मुरमे आणि डाग वाढू शकतात. त्यामुळे नेहमी सनस्क्रीन विकत घेताना SPF 30 किंवा त्याहून अधिक असलेले नॉन-कॉमेडोजेनिक सनस्क्रीन लावा.

४. कमी मेकअप वापरा आणि व्यवस्थित काढा (Use Less Makeup And Remove Properly)

उन्हाळ्यात मेकअप त्वचेसाठी अडथळा निर्माण होतो. जर मेकअप आवश्यक असेल, तर तो हलका वा कमी प्रमाणात मेकअप करा आणि दिवसाच्या शेवटी क्लींजरद्वारे तो पूर्णपणे स्वच्छ करून घ्या. त्यासाठी सौम्य क्लींजर वापरा; जेणेकरून त्वचा उन्हातही आरामदायी वाटेल आणि त्रासरहित राहू शकेल.

५. हातांनी चेहऱ्याला स्पर्श करू नका (Stop Touching Your Face With Your Hands)

उन्हाळ्यात, चेहऱ्याला खूप घाम येतो आणि आपण तो सतत पुसत राहतो. खरं तर, आपल्या हातात असे जीवाणू असतात, जे चेहऱ्याला स्पर्श केल्याने त्वचेत जाऊ शकतात. त्यामुळे मुरमांची समस्या वाढू शकते. त्यामुळे चेहऱ्याला वारंवार स्पर्श करण्याची सवय सोडून द्या आणि स्वच्छतेकडे लक्ष द्या.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Summer skin care tips for pimples or why you need a skincare routine for acne asp