Correct place for WiFi Router: सध्याच्या ऑनलाईन जगात इंटरनेटशिवाय कुणाचंही पान हलत नाही. सध्या वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन क्लासेसमुळे इंटरनेट कनेक्शनसाठी वाय-फाय राउटर महत्त्वाचे डिव्हाइस झाले आहे. स्मार्टफोनमधील इंटरनेटवर सर्व कामे शक्य नसल्यान ब्रॉडबँड कनेक्शन घ्यावे लागते. अशावेळेस वाय-फाय राउटरची गरज भासते. मात्र, अनेकदा राउटर व्यवस्थित काम करत नाही व याचा परिणाम इंटरनेटवर होतो. राउटर चुकीच्या ठिकाणी ठेवल्याने देखील कनेक्टिव्हिटीची समस्या निर्माण होऊ शकते. अशाच काही टिप्सबद्दल जाणून घेऊया, ज्याद्वारे तुमचे वाय-फाय राउटर व्यवस्थित काम करेल व इंटरनेट देखील फास्ट चालेल. अनेकदा घरात लावलेलं वाय-फाय राउटर घरातील प्रत्येक कोपऱ्यात स्पीड देत नाही. यामुळे लोक प्लॅन अपग्रेड करण्याचा विचार करु लागतात. मात्र राउटरची फक्त जागा बदलली तरी तुमची अडचण दूर होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या लोकेशन्सवर राउटर ठेवल्याने चांगली स्पीड मिळते.

तुम्ही अनेक खोल्या असलेल्या मोठ्या घरात रहात असाल किंवा एक किंवा दोन खोल्या असलेल्या लहान अपार्टमेंटमध्ये, तुम्ही जिथे तुमचा राउटर ठेवता त्याचा तुमच्या वाय-फाय कनेक्शनवर परिणाम होईल. जवळजवळ प्रत्येकाने याआधी खराब किंवा स्पॉट वाय-फायशी लढा दिला आहे आणि तुम्हाला कमकुवत वाय-फायचा सामना करायचा आहे ते शेवटचे ठिकाण तुमच्या स्वतःच्या घरात आहे.

राउटरला जमिनीवर ठेऊ नका

वाय-फाय राउटरद्वारे मिळणाऱ्या स्पीडमध्ये मेटल अथवा भिंत अडथळा ठरू शकते. त्यामुळे कोणताही अडथळा नसेल अशा ठिकाणी राउटरला ठेवावे. तसेच, जमिनीवर ठेवणे देखील टाळावे.

उंचीवर असावं राउटर

लक्षात ठेवा की, WiFi चं राउटर भितींवर किंवा टेबलवर काही उंचीवर ठेवलेलं असलं पाहिजे. यामुळे सिग्नल्स चांगल्या प्रकारे प्रसारित होण्यास मदत मिळते.

खिडकीजवळ लावू नका राउटर

वायफायचं राउटर रिफ्लेक्टिव्ह सरफेस जसं की, खिडकी किंवा आरशाजवळ असू नये असा प्रयत्न करा. यामुळे सिग्नल बाउंस होतं आणि इंटरपेरेन्स क्रिएट होतं.

हेही वाचा >> Kitchen Jugaad:आईस्क्रिम खाल्ल्यानंतर काठी टॉयलेटमध्ये टाका; मोठ्या समस्येवर उपाय, काय ते VIDEO मध्ये पाहाच

इलेक्ट्रॉनिक गॅजेटपासून दूर ठेवा

वाय-फाय राउटरला इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जवळ ठेवू नये. टीव्ही, ब्लूटूथ हेडसेट, फ्रीज सारख्या इलेक्ट्रिक सामानापासून दूर ठेवावे. यामुळे अधिक चांगला सिग्नल मिळेल.

वायफाय राउटरने चांगली कनेक्टिव्हिटी आणि स्पीड मिळवण्यासाठी आणखी काही गोष्टींकडेही लक्ष ठेवा. जकं की, राउटरच्या एन्टेनाची दिशा कशी आहे. फर्मवेयर अपडेट आहे की नाही, यासोबतच राउटर किती जुनं आहे. अशा प्रकारच्या गोष्टींकडे लक्ष ठेवायला हवं.