Easy Tips to remove worms from cauliflower: फ्लॉवरची भाजी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकजण खूप आवडीने खातात. परंतु, आजकाल फ्लॉवरमध्ये मोठ्या प्रमाणात आळ्या असतात, ज्या अनेकदा दिसून येत नाहीत. अशा परिस्थितीत जर तुम्हाला फ्लॉवरच्या भाजीतील आळ्या काढून टाकायच्या असतील तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. येथे आम्ही तुम्हाला फ्लॉवरमधील कीटक काढून टाकण्याचा एक सोपा मार्ग सांगणार आहोत. यासोबत फ्लॉवर खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
फ्लॉवरमधील आळ्या काढून टाकण्याचा सोपा मार्ग
सर्वप्रथम फ्लॉवरचे बारीक तुकडे करा. नंतर त्यात आळ्या आहेत की नाही ते काळजीपूर्वक तपासा. त्यानंतर फ्लॉवरचे तुकडे एका भांडयात ठेवा आणि फ्लॉवरवर काही वेळ पाणी घालून स्वच्छ धुवा. असे केल्याने आळ्या बाहेर येतात. परंतु, त्यानंतरही काही आळ्या आत राहिल्या तर त्या बाहेर काढण्यासाठी फ्लॉवरचे तुकडे गरम पाण्यात टाका. त्यानंतर पाण्यात एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद घाला. सुमारे १० मिनिटे मंद आचेवर राहू द्या. नंतर गॅस बंद करा. फ्लॉवर काही वेळ पाण्यात राहू द्या. काही वेळाने फ्लॉवर बाहेर काढा.
फ्लॉवरमध्ये आळ्या आहेत की नाही हे कसे ओळखायचे?
जेव्हा तुम्ही बाजारात फ्लॉवर खरेदी करायला जाल, तेव्हा प्रथम तो काळजीपूर्वक तपासा; जर तुम्हाला त्याच्या कोणत्याही भागात काळे किंवा लहान छिद्रे दिसली तर ती खरेदी करणे टाळा. या प्रकारच्या फ्लॉवरमध्ये कीटकांचा प्रादुर्भाव असू शकतो.