Health Tips:शरीराची रचना आणि समतोल राखण्यासाठी निरोगी हाडे खूप महत्त्वाची मानली जातात. यामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास त्याचा परिणाम एकूण आरोग्यावर होऊ शकतो. हाडांच्या समस्यांमुळे जीवनशैलीच्या सामान्य कार्यामध्ये देखील व्यत्यय येऊ शकतो, म्हणूनच आरोग्य तज्ञ सर्व लोकांना त्यांची हाडे निरोगी ठेवण्यासाठी उपाय करत राहण्याची शिफारस करतात. तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही वर्षांत लोकांच्या वाढलेल्या आहार आणि जीवनशैलीच्या सवयींमुळे कमी वयात हाडांशी संबंधित आजारांचा धोका वाढला आहे. हेच कारण आहे की बहुतेक लोकांच्या वयाच्या ३० व्या वर्षी हाडांच्या वस्तुमानात घट होत आहेत. या परिस्थितीमुळे ऑस्टियोपोरोसिस किंवा संधिवात यांसारख्या समस्यांचा धोका वाढतो. हाडे निरोगी ठेवण्यासाठी आहाराची विशेष भूमिका असते, त्यामुळे सर्वांनी निरोगी आणि पौष्टिक गोष्टींच्या सेवनाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. चला जाणून घेऊया दैनंदिन जीवनातील कोणत्या वाईट सवयी आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे हाडांची समस्या वाढते, तसेच त्या कशा टाळता येतील?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) भरपूर प्रथिनांचे सेवन

स्नायूंना निरोगी ठेवण्यासाठी आणि शरीराचे कार्य उत्तमरीत्या चालवण्यासाठी प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करणे अत्यंत आवश्यक मानले जाते. मात्र, जर तुम्ही प्रथिनांचे जास्त प्रमाणात सेवन केले तर त्यामुळे हाडांनाही नुकसान होऊ शकते. भरपूर प्रथिनेयुक्त पदार्थ खाल्ल्यास शरीराला जास्त प्रमाणात कॅल्शियम उत्सर्जित करावे लागते, ज्यामुळे हाडांना आवश्यक खनिज पुरेशा प्रमाणात मिळत नाही. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमजोर होतात. त्यामुळे प्रथिनांचे सेवन करावे मात्र कमी प्रमाणात करावे. असे केल्याने तुमची हाडे देखील मजबूत राहतील.

( हे ही वाचा: High Cholesterol: तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतात उच्च कोलेस्टेरॉलची ‘ही’ लक्षणे; अजिबात दुर्लक्ष करू नका)

२) बैठी जीवनशैलीचे तोटे

बैठी जीवनशैली म्हणजे शारीरिक निष्क्रियतेमुळे देखील शरीरावर अनेक प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात, हाडांची समस्या देखील त्यापैकी एक आहे. जास्त वेळ एकाच जागी बसण्याची किंवा घरात राहण्याची सवय तुमच्यासाठी समस्या वाढवू शकते. या सवयीमुळे शारीरिक निष्क्रियता तर वाढतेच पण सूर्यप्रकाशातील तुमचा संपर्कही कमी होतो. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत आहे, जो कॅल्शियम शोषण्यासाठी आवश्यक आहे. अशा परिस्थितीत घराबाहेर न पडण्याची सवय हाडांसाठी हानिकारक ठरू शकते. त्यासाठी घराबाहेर पडा. त्यामुळे तुमच्या शरीराची देखील हालचाल होईल आणि तुम्हाला हाडांची समस्या देखील उद्धभवणार नाही.

३) धूम्रपान आणि सोडियमचे जास्त सेवन

सोडियम उच्च रक्तदाबाचे घटक म्हणून ओळखले जाते, परंतु तुम्हाला माहित आहे का की यामुळे हाडांनाही नुकसान होते. सोडियमसोबतच धुम्रपानही हाडांसाठी हानिकारक मानले जाते. संशोधनानुसार, धूम्रपान करणाऱ्या महिलांमध्ये इस्ट्रोजेन हार्मोनचे उत्पादन कमी होते, ज्यामुळे अकाली रजोनिवृत्ती होऊ शकते. या स्थितीमुळे ऑस्टियोपोरोसिस सारख्या हाडांच्या विविध आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे दैनंदिन जीवनात सोडियमचे जास्त सेवन करणे टाळा. तसच जास्त धूम्रपान देखील करू नका जेणेकरून तुमच्या हाडांवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही.

( हे ही वाचा: पावसाळ्यात घ्या पायांची खास काळजी, जाणून घ्या या ५ टिप्स)

हाडे निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सर्व वयोगटातील लोकांनी हाडे निरोगी ठेवण्यासाठी उपाय करत राहायला हवे. यासाठी निरोगी जीवनशैली आणि आहार पाळणे अत्यंत आवश्यक आहे.

  • हिरव्या भाज्या खा.
  • नियमितपणे योगाभ्यास करण्याची सवय लावा.
  • कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ खा.
  • मद्यपान आणि धूम्रपानामुळे हाडांचे नुकसान होते, त्यामुळे ते टाळा.
  • हाडे निरोगी ठेवण्यासाठी सूर्यप्रकाशात जाण्याचा प्रयत्न करा.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These habits can weaken bones at an early age take care now gps
First published on: 24-06-2022 at 13:19 IST