Foods Causing Bad Breath : तोंडाला दुर्गंधी येणं ही अतिशय सामान्य समस्या आहे. यात आहारातील काही पदार्थ्यांच्या सेवनामुळे तोंडाला दुर्गंधी येऊ शकते. तोंडाचा वास येत असेल तर लोकांमध्ये बोलताना लाज वाटू लागते. अशावेळी या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. काही जण जेवल्यानंतर लगेच ब्रश करतात, पण यानंतरही समस्या कायम राहते. त्यामुळे नेमक्या कोणत्या पदार्थांच्या सेवनाने तोंडाला दुर्गंधी येते याविषी जाणून घेऊ,….

या पदार्थांच्या सेवनाने तोंडातून येतो घाण वास

१) लसूण :

लसणामध्ये सल्फर संयुगे असतात, जे तुमच्या तोंडात आणि रक्तप्रवाहात राहतात. यामुळे लसूण खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येऊ लागते. अशावेळी ब्रश केल्यानंतरही लसणाचा वास पूर्णपणे जात नाही. जर तुम्ही नियमित लसूण खात असाल तर तुमच्या श्वासाला खूप दुर्गंध येऊ शकतो.

२) कांदे :

कच्च्या कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे कांदा खाल्ल्यानंतर बोलताना तोंडातून तीव्र वास येतो. पचनानंतरही हा वास तुमच्या फुफ्फुसांमधून परत तोंडावाटे येत राहतो.

३) कॉफी :

कॉफीमुळे तोंड कोरडे होते आणि लाळेचा प्रवाह कमी होतो. कमी लाळेमुळे तोंडातील दुर्गंधीयुक्त जीवाणू वाढू शकतात. अशाने बोलताना तोंडातून दुर्गंधी येते.

४) बिअर :

बिअरमुळे डिहायड्रेशन आणि तोंड कोरडे होते. अशाने तोंड कोरडे पडल्याने दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांची संख्या वाढते, ज्यामुळे कॉफी प्यायल्यानंतर बोलताना तोंडातून दुर्गंधी येते.

५) पॅक ट्यूना मासा :

ट्यूनासारख्या पॅकिंग केलेल्या माशांमधून तीव्र वास येतो. त्यातील प्रोटीनची मात्र कमी होते, अशाने हे मासे सेवन केल्यास तोंडातून तीव्र घाणेरडा वास येऊ लागतो.