स्वयंपाकात वापरले जाणारे मसाले कोणत्याही खाद्यपदार्थाची चव वाढवतात. खवय्ये मंडळींना तर भरपुर मसाले असणारे खाद्यपदार्थ खाणे आवडते, तर काही जणांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मसालेयुक्त अन्नपदार्थ टाळावे लागतात. आपण कधी आजारी पडलो तर पटकन बर होण्यासाठी डॉक्टर साधे अन्नपदार्थ खाण्याचा सल्ला देतात, तेव्हा ते मसाल्यांशिवाय असणारे जेवण आपल्याला बेचव वाटते. चविष्ट जेवण बनवणे मसाल्यांशिवाय कठीण आहे, त्यामुळे स्वयंपाकघरात वापरले जाणारे मसाले यांची योग्यरित्या साठवण करण्याकडे महिलावर्गाचा कल असतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अधिक काळ टिकणारे मसाले देखील हवामान बदलानुसार खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी महिला वर्गाकडून मसाले जास्त दिवस टीकावे यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. यासाठी काही टिप्स वापरून मसाल्यांची सेल्फ लाईफ वाढवता येते. कोणत्या आहेत त्या टिप्स जाणून घेऊया.

आणखी वाचा : तळलेले पदार्थ बनवताना तब्येतीची काळजी वाटते; ‘या’ ट्रिक्स वापरून जेवण बनवा आणि चिंता दूर करा

मसाले साठवण्याची पद्धत
मसाले ज्या पॅकेटमध्ये विकले जातात, त्यांचे पॅकेजिंग विशेष पद्धतीने केले जाते. त्यामुळे शक्य असल्यास मसाले त्याच पॅकेटमध्ये ठेवावे, त्यामुळे मसाले जास्त दिवस टिकून राहतील.

जास्त प्रमाणात मसाले विकत घेणे टाळावे
मसाले विकत घेताना आवश्यक तेवढ्याच प्रमाणात मसाले विकत घ्यावे. जास्त प्रमाणात मसाले विकत घेतले तर ते लवकर संपत नाहीत आणि वातावरणातील बदलानुसार ते खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे गरजेपुरतेच मसाले विकत घ्यावे, त्यामुळे ताजे मसाले वापरता येतील.

एअर टाईट भरणीत मसाले साठवा
जर मसाल्याच्या पॅकेटमध्ये मसाले ठेवणे शक्य नसेल तर एअर टाईट भरणीत मसाले साठवा. यामुळे मसाले लवकर खराब होणार नाहीत.

Body Pain Causes : तुम्हाला सतत अंगदुखी जाणवते का? जाणून घ्या यामागचे कारण

मसाल्याचा डबा ठेवण्याची जागा
मसाल्याचा डबा नेहमी कोरड्या आणि थंड ठिकाणी ठेवावा. मसाल्याच्या डब्यावर सूर्यप्रकाश येणार नाही याची काळजी घ्या. यामुळे मसाला जास्त दिवस टिकून राहील.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tips to increase shelf life of spices pns