Noodles Boiling Tips: बहुतेक लोकांना चायनीज पदार्थ खायला बरेच आवडतात. चायनीज म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. विशेषत: नूडल्स हे बहुतेक जणांचे आवडते असतात. घरच्या घरी नूडल्स बनवणे अवघड नाही, पण ते बनवताना सर्वात मोठी अडचण ही असते, की घरी बनवलेले नूडल्स हे मार्केट स्टाइलचे नसतात. घरगुती नूडल्स बरेच वेळा चिकट होतात. तर स्ट्रीट फूड नूडल्स अतिशय परफेक्ट असतात. मुळात, परफेक्ट नूडल्स बनवण्यासाठी तुम्हाला नूडल्स चांगले उकळावे लागतील. यासाठी तुम्हाला उकळण्याची योग्य पद्धत माहित असणे आवश्यक आहे. चला तर मग नूडल्स उकळण्याच्या पद्धती जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) नूडल्स तोडू नका

जर तुम्हाला परफेक्ट नूडल्स बनवायचे असतील, तर त्यासाठी तुम्ही जे नूडल्स वापरता ते तोडू नका. बहुतेक वेळा आपण नूडल्स उकळताना तोडतो आणि मग पाण्यात टाकतो. पण तसे न करता नूडल्स पॅकेट मधून काढल्यावर जशास तसे पाण्यात घाला. यामुळे तुम्हाला लांब रेस्टॉरंट सारखे नूडल्स असतात त्याप्रमाणे नूडल्स मिळतील. त्यामुळे ते खायला देखील चांगले लागतात.

२) पाण्यात तेल आणि मीठ घाला

जेव्हा आपण घरी नूडल्स करतो तेव्हा बहुतेक वेळा नूडल्स तुटतात किंवा चिकट होतात. यासाठी नूडल्स उकळताना नेहमी मध्यम आचेवर उकळण्यासाठी ठेवा. गॅस कधीही मोठा करू नका. गॅस मोठा केल्यास नूडल्स लवकर शिजतील आणि तुटतील. त्यामुळे नेहमी नूडल्स मध्यम आचेवर शिजवा. त्यांनतर नूडल्स उकळताना पाण्यात अर्धा चमचा तेल आणि मीठ घाला. असे केल्याने तुमचे नूडल्स तुटणार नाहीत.

( हे ही वाचा: डार्क चॉकलेट खायला आवडतं? तर जाणून घ्या त्वचेसाठी असणारे त्याचे आश्चर्यकारक फायदे)

३) नूडल्स ७०% शिजवा

जेव्हा पाणी उकळायला लागेल त्यांनतर त्यात नूडल्स टाकणे कधीही चांगले असते. यामुळे नूडल्स पूर्णपणे शिजणार नाहीत. नूडल्स उकळत्या पाण्यात टाकल्यानंतर नूडल्स मऊ करण्यासाठी ३ मिनिटे ढवळून घ्या. नूडल्स पूर्णपणे उकळण्याची वाट पाहू नका, नूडल्स ७०% शिजल्यावर गॅस बंद करा. तुम्ही जर जास्त नूडल्स शिजवलात तर तुमचे नूडल्स तुटतील. तसं पण नूडल्स नंतर बनवताना पूर्ण शिजणारच आहेत. त्यामुळे नूडल्स उकळताना पूर्णपणे शिजू देऊ नका.

४) नूडल्स नीट कोरडे होऊ द्या

जेव्हा तुमचे नूडल्स ७०% शिजतील त्यांनंतर ते भांड्यातून बाहेर काढा आणि त्यातील अतिरिक्त पाणी काढून टाकण्यासाठी चाळणीत नूडल्स काढून घ्या. याने तुमचे नूडल्स कोरडे होतील आणि तुम्हाला ते खाताना चिकट लागणार नाहीत. चाळणीत नूडल्स काढून त्यातील जास्त पाणी काढून टाकल्याने नूडल्स सुटसुटीत होतील.

( हे ही वाचा: पांढरा चहा म्हणजे काय?; जाणून घ्या तो इतका महाग का आहे?)

५) नूडल्सवर थंड पाणी घाला

जेव्हा तुम्ही नूडल्स भांड्यामधून चाळणीत काढाल, त्यांनंतर नूडल्सवर ४ कप थंड पाणी घाला आणि नूडल्स एका भांड्यात पुन्हा वेगळे काढून घ्या. याने तुमचे नूडल्स चिकट होणार नाहीत आणि तुमचे नूडल्स तुटणार देखील नाहीत आणि तुम्ही घरच्या घरी रेस्टॉरंटसारखे नूडल्स खाण्याचा आस्वाद घेऊ शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To prevent the noodles from sticking boil in this way learn the steps gps
First published on: 27-06-2022 at 13:26 IST