Trick For Lemon Tree : स्वयंपाकघरासह अनेक कामांसाठी दररोज लिंबाची गरज असते. अशा परिस्थितीत, बरेच लोक त्यांच्या स्वयंपाकघरातील बागेत किंवा कुंडीत लिंबाचे रोप लावतात, परंतु ते सहसा तक्रार करतात की, त्या रोपाला जास्त लिंबू येत नाहीत. रोपाला भरपूर लिंबू यावेत यासाठी अनेक उपाय आहेत. घरच्या घरी लिंबाच्या झाडापासून अधिक लिंबू मिळविण्यासाठी उपाय जाणून घ्या

लिंबू रोपाची काळजी घ्या

योग्य ठिकाणी लागवड करा

लिंबू रोपाची लागवड अशा ठिकाणी करा जिथे चांगला सूर्यप्रकाश असेल, कारण त्याला भरपूर सूर्यप्रकाश हवा असतो. जर रोप कुंडीत लावले असेल तर किमान दोन ते तीन तास चांगला सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा.

जास्तीचे पाणी काढून टाका

लिंबाचे रोप कुंडीत लावले असेल तर पाण्याचा निचरा होईल याची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. कुंडीत पाणी साचल्याने झाडाची मुळे कुजण्याचा धोका असतो.

२० इंचाची कुंडी वापरा

लिंबूचे रोप लावण्यासाठी मोठी कुंडी घ्या. मोठ्या कुंडीमध्ये लिंबाच्या मुळांना पसरायला भरपूर जागा मिळते. किमान २० इंचाच्या भांड्यात लिंबू लावा.

हेही – Visa on Arrival India: भारतीयांना मिळणार परदेशात फिरण्याची संधी! व्हिसाची चिंता सोडा, लगेच तिकीट बुक करा

हळदीच्या पाणी टाका

लिंबाची भरपूर रोपे मिळविण्यासाठी, हळदीच्या पाणी टाका. कच्ची हळद बारीक करून एक लिटर पाण्यात मिसळा आणि झाडाच्या मुळांवर घाला. दोन ते चार महिन्यांनी हे पुन्हा करा. काही दिवसात रोपाला भरपूर लिंबू येतील.

टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.