स्वयंपाकघर म्हणजे घराचा आत्मा. घराचा आत्माच जर आनंदी-प्रफुल्लीत असेल तर या घरात आनंदी वातावरण निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. गृहिणी त्यांची हक्काची जागा असलेल्या किचनला सुंदर बनवण्यासाठी काही ना काही युक्त्या वापरत असतात. हल्ली अनेकांच्या घरात मॉड्युलर किचन असल्यामुळे मोठी जागा असल्यामुळे छान सजवता येतं. पण ज्यांच्या घरात छोटं किचन आहे, त्यांना फ्रीज, टेबल, किचन ओटा यामुळे पुरेशी जागा मिळत नाही. त्यामुळे किचन सजवण्यासाठी हवी तितकी जागाच उरत नसल्यामुळे अनेकांना समस्या येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा वस्तू सांगणार आहोत, ज्याने तुमच्या किचनला कमी जागेत सुद्धा सुंदर बनवू शकतील. जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१. सेलो चेकर्स प्लास्टिक पीईटी कॅनिस्टर सेट

किचनमध्ये जेवण बनवताना लागणाऱ्या वेगवेगळ्या डाळी आणि इतर धान्य ठेवण्यासाठी सेलो चेकर्स प्लास्टिक पीईटी कॅनिस्टर सेट हा १८ बरण्यांचा सेट मिळतो. प्लास्टिकच्या बरण्यांचा हा सेट एफडीए प्रमाणित पॉलीथिलीन टेरेफथलेटचे बनलेले असतात. हे 100% फूड ग्रेड आणि BPA मुक्त आहेत. हे हवाबंद डब्बे असून यातील स्नॅक्स, डाळी, धान्य अगदी ताजे आणि कुरकुरीत राहतात.

२. पिक्सेल होम कॉटन किचन क्लीनिंग टॉवेल

किचनची साफसफाई करणं खूप कठीण असतं. तेल आणि चिकटपणा घालवण्यासाठी गृहिणींना बरीच मेहनत घ्यावी लागते. हे टॉवेल भांडी पुसणे, हात पुसणे, गरम भांडी पकडणे, साफसफाई करणे यासाठी वापरत असतात. त्यावर एका वापरातच बरेच जीवाणू येतात. टॉवेल ओले असल्याने त्यावर जीवाणू अधिक असतात. कोरड्या टॉवेलवर ते कमी असतात. त्यासाठी पिक्सेल होम कॉटनचे सहा किचन क्लीनिंग टॉवेलचा एक संच मिळतो. हे टॉवेल कापसापासून बनलेले असतात. हे टॉवेल वेगवेगळ्या स्टाइलमध्ये आणि पॅटर्नमध्ये उपलब्ध असतात.

३. लेव्हरेट मल्टीपर्पज प्लास्टिक बिग रिव्हॉल्व्हिंग स्पाइस रॅक

किचनमध्ये वापरण्यात येणारे वेगवेगळे मसाले आणि पावडर ठेवण्यासाठी हा एक मसाला रॅक मिळतो. यात जवळपास १६ ते २४ जारचा संच मिळतो. यातील सर्व जार हे उच्च-गुणवत्तेचे बीपीए मुक्त आणि ग्रेड पीपी प्लास्टिकने बनलेले आहेत. हा मसाला रॅक आपल्याला हवं तसं 360-डिग्री फिरवून हवा जार उचलण्याची सोय देण्यात आली आहे.

४. आत्मनिवेदी स्टेनलेस स्टील थ्री लेअर किचन रॅक होल्डर

जर तुमच्या किचनमध्ये वस्तू ठेवण्यासाठी जागा शिल्लक नाही, असं वाटत असेल तर हा आत्मनिवेदी स्टेनलेस स्टील थ्री लेअर किचन रॅक होल्डर तुमच्या उपयोगाचं ठरू शकतं. हा रॅक तुम्हाला किचनमध्ये हवं तिथे ठेवू शकतो. या रॅकमध्ये तुम्ही किचन ओट्यावरील लागणारे छोटे मोठे साहित्य ठेवू शकता किंवा फळं देखील व्यवस्थित ठेवू शकता. बाथरूममध्ये गरज लागल्यास हाच रॅक ठेवून त्यात वेगवेगळे डिटर्जंट, साबण, शॅम्पूचे बॉटल्स, फिनेल अशा वस्तू व्यवस्थित ठेवू शकता.

५. मीलाना एअरटाइट कंटेनर जार सेट

जर आपण आतापर्यंत स्वयंपाकघरात वस्तू ठेवण्यासाठी प्लॅस्टिकची बरणी ठेवत असाल तर त्यास एक चमकदार ग्लास जारने बदला. सर्व प्रथम, प्लास्टिकच्या भांड्यात वस्तू साठवणे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. त्याच वेळी, जेव्हा आपण एक ग्लास जार वापरता तेव्हा हे सहजतेने समजते की, कोणत्या जारमध्ये कोणत्या वस्तू आहेत. तसेच स्वयंपाकघरात ग्लास जार अतिशय सुंदर दिसतात. हे आपल्या किचनला एक मोहक देखावा देतात. मीलानाचे एकूण सहा एअरटाइट कंटेनर जारचा सेट मिळतो. हे 100% लीक प्रूफ असतात आणि आपले अन्न सुरक्षित आणि कुरकुरीत ठेवतात.

६. शक्ती ट्रेडर वुडन सर्व्हिंग आणि स्पुन सेट

यात तुम्हाला एकूण सात लाकडी चमच्यांचा सेट मिळतो. वेगवेगळ्या स्टाइलमध्ये आणि रचनांमध्ये या लाकडी चमच्यांचा सेट उपलब्ध असतो. या स्टाइलच्या चमच्यांमुळे तुमच्या किचना वेगळाच लूक मिळतो.

७. पिक्सेल होम डेकोर प्रिंटेड एप्रन

हा मौवे शेड असलेला प्रिंटेड एप्रन सेट ओव्हन मिट आणि पॉट होल्डरसह येतो. हे 100% सूतीपासून बनलेला आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trust these 7 top kitchen accessories to notch up your cooking space prp