Tulsi Vivah 2025 And Kartik Ekadashi 2025 Wishes Quotes Messages : दिवाळीनंतर अनेकांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे. कारण- त्यानंतर दिवाळी सण संपन्न होऊन, लग्नसराईला सुरुवात होते. या सणाला केवळ धार्मिक महत्त्वच नाही, तर निसर्गाशीही त्याचा संबंध आहे. दिवाळीनंतरच्या पहिल्या एकादशीला तुळशीची पूजा केली जाते. हा दिवस तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो. त्याशिवाय त्या दिवशी कार्तिकी एकादशी म्हणजे देवउठनी एकादशीदेखील साजरी केली जाते. आषाढी एकादशी (देवशयनी एकादशी)पासून श्री विष्णू योगनिद्रेत जातात, जे कार्तिक एकादशीला जागे होतात, असे म्हटले जाते. त्यामुळे आषाढ ते कार्तिक हा चार महिन्यांचा काळ चातुर्मास म्हणून पाळला जातो. या काळात कोणतेही शुभ कार्य वर्ज्य असते. कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुळशी विवाहाला सुरुवात झाली की, वर्ज्य असलेल्या शुभ कार्यांना सुरुवात होते.
यंदा २ नोव्हेंबर रोजी कार्तिक एकादशी आणि तुळशी विवाहाला सुरुवात होईल. कार्तिकी एकादशी आणि तुळशी विवाहानिमित्त तुम्ही आपल्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा देऊ शकता. हे तुळशी विवाह आणि कार्तिकी एकादशी संदेश तुम्ही Messages, Wishes, Whatsapp Status, SMS द्वारे पाठवून त्यांचा हा सण आनंदी करू शकता.
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
१) ज्या अंगणात तुळस आहे,
तिथे देवी-देवतांचा वास आहे,
ज्या घरात ही तुळस आहे
ते घर स्वर्गासमान आहे,
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
२) तुळशीचे पान
एक त्रैलोक्यासमान,
उठोनिया प्रात:काली
करुया तिला वंदन
आणि राखूया तिचा मान
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
३ ) हळद लागली, तुळस सजली
विवाहासाठी तयार झाली,
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
४) चला वाटूया पेढे आणि गाऊया
मंगलमयी मंगलाष्टके
कारण आज आहे आपल्या
लाडक्या तुळशीचे लग्न
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
५) अंगणात तुळस आणि शिखरावर कळस हीच आहे महाराष्ट्राची ओळख…
कपाळी कुंकू आणि डोक्यावर पदर, हीच आहे सौभाग्याची ओळख…
तुळशी विवाहनिमित्त मंगलमय शुभेच्छा!
६) ऊसाचे मांडव सजवूया आपण,
विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण,
तुम्हीही व्हा आमच्या आनंदात सामील,
मोठ्या थाटात तुळशी विवाह करूया आपण.
तुळशीच्या लग्नाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा
१) अवघा रंग एक झाला
विठू माझा अबीर-गुलालात न्हाला,
सारे वारकरी जमले पंढरी
बोला पांडुरंग हरी!
२) तूच माझी आई देवा, तूच माझा बाप अन् सखा,
तूच जगाचा वाली, तूच साऱ्यांचा पाठीराखा
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
३) विठू, तुझ्या गजरात तल्लीन व्हावे
सावळ्या तुझ्या रंगाला डोळे भरूनी पहावे,
प्रत्येक श्वासात विठ्ठला तुझे नाव असावे
राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी म्हणावे!
४) तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख
पाहिन श्रीमुख आवडीने
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
५) टाळ वाजे, मृदृंग वाजे
वाजे विठूच्या वीणा,
वारकरी आले पुंढरपुरा
मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा..!
