दुसऱ्या स्तरावर पोहोचलेल्या मधुमेहामुळे मेंदूचे कार्य मंदावत असल्याचा शोधलावल्याचा दावा ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी केला आहे.
एबीसीच्या अहवालानुसार सिडनी स्मृती आणि मानवी वय अभ्यास संस्थेने दुसऱ्या स्तरातील मधुमेह पीडित व्यक्तींचा अभ्यास केला. सामान्य व्यक्तींच्या तुलनेमध्ये मधुमेहने पीडित व्यक्तींच्या मेंदूची कार्यक्षमता मंदावली असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे.
दोन वर्षे सुरू असलेल्या या अभ्यासामध्ये ७० ते ९० वयोगटाच्या ८८० व्यक्तिंची निरिक्षणे नोंदवण्यात आली. या निरिक्षणांमधून मधूमेह झालेल्या मात्र, साखर नियंत्रीत असलेल्या व्यक्तिमध्ये मेंदूच्या अकार्यक्षमतेचा धोका टाळता आल्याचे दिसून आले. हा एक अत्यंत महत्वाचा शोध असून,  मधुमेह झाल्यापासूनच्या कालावधीशी याचा संबंध नाही.”, असे या अभ्यास गटाच्या प्रमुख कॅथरिन समरस यांनी सांगितले.
“जर तुम्ही वयाच्या सत्तरीमध्ये असाल व तुम्हाला मधुमेह झाला नसेल तर या वयात मधुमेह न होण्याची काळजी घ्यायला हवी. वयाच्या सत्तराव्या वर्षानंतर मधुमेह झालेल्या व्यक्तींना स्मृतीभ्रंशाला सामोरे जावे लागते. या स्तरातील मधुमेहामुळे मेंदूचे कार्य मोठ्या प्रमाणावर मंदावते.”,  असे कॅथरिन म्हणाल्या.                   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Type 2 diabetes reduces brain functioning study