Google Duo हे गुगल कंपनीचं व्हिडिओ कॉलिंग अ‍ॅप लवकरच ‘अनसर्टिफाइड अँड्रॉइड’ स्मार्टफोन्सवर काम करणार नाही. यापूर्वी कंपनीने अनसर्टिफाइड अँड्रॉइड स्मार्टफोन्ससाठी आपली गुगल मेसेज सेवा बंद केली होती. त्यानंतर आता व्हिडिओ कॉलिंग सेवाही बंद करणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

9to5Google च्या रिपोर्टनुसार, Google Duo या व्हिडिओ कॉलिंग अ‍ॅपच्या अपडेट कोडमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. ज्या युजर्सच्या डिव्हाइसवर गुगल ड्यूओ काम करणार नाही अशांना कंपनीकडून मेसेजद्वारे माहिती दिली जाईल. या मेसेजमध्ये कंपनी युजर्सना क्लिप्स आणि कॉल हिस्ट्री डाउनलोड करण्यास सांगेल, जेणेकरुन युजर्सकडेत्यांचा डेटा सुरक्षित राहिल. अपडेट कोडनुसार, अनसर्टिफाइड फोनचे युजर्स 31 मार्च 2021 नंतर गुगल ड्यूओचा डेटा डाउनलोड करु शकणार नाहीत.

आणखी वाचा- Twitter वर पुन्हा सुरू झालं ‘ब्लू टिक व्हेरिफिकेशन’, तीन वर्षांनी झालं पुनरागमन; जाणून घ्या डिटेल्स

अनसर्टिफाइड अँड्रॉइड डिव्हाइस म्हणजे काय?
अनसर्टिफाइड अँड्रॉइड डिव्हाइस म्हणजे ते स्मार्टफोन ज्यांची गुगल कधी टेस्ट घेत नाही. या फोन्समध्ये प्ले स्टोअर सर्व्हिसशिवाय प्री-इंस्टॉल्ड गूगल अ‍ॅपही मिळत नाहीत. ज्या कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर गुगल ड्यूओ सेवा बंद होणार आहे त्यामध्ये huawei चा समावेश आहे. जर तुमच्याकडे नोकिया, सॅमसंग, वनप्लस, ओप्पो किंवा व्हिवो या कंपन्यांचा स्मार्टफोन असेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uncertified android devices to lose google duo support according to report sas