Frequent Urination Reason: लघवी म्हणजे आपल्या शरीरातून बाहेर टाकले जाणारे विषारी पदार्थ (टॉक्सिन्स) असतात, जे किडनी फिल्टर करून युरिनच्या माध्यमातून शरीराबाहेर टाकते. जेव्हा आपण द्रव पदार्थ (लिक्विड फूड्स) घेतो, तेव्हा किडनी ते द्रव फिल्टर करून लघवीच्या रूपात बाहेर टाकते.
दिवसभरात ५ ते ७ वेळा लघवी होणे हे सामान्य मानले जाते. पण, काही लोक असे असतात की ते लघवी करून आले की काही वेळातच त्यांना पुन्हा लघवी झाल्यासारखी वाटू लागतं. ते फारसं पाणीही पित नाहीत, तरीही दर अर्ध्या तासाला लघवी करण्यासाठी धावतात. जर तुम्हालाही वारंवार लघवीची भावना होत असेल, तर ही सवय नसून एक समस्या आहे. वारंवार लघवी होणे ही अनेक आजारांची लक्षणे असू शकतात.
नारायणा हॉस्पिटल, आर. एन. टागोर हॉस्पिटल, मुकुंदपूर येथील न्यूरोलॉजी आणि यूरोऑन्कोलॉजीचे कन्सल्टंट डॉक्टर बोपन्ना वेंकटा बी यांनी सांगितले की, जर एखादी व्यक्ती दिवसात सहा वेळा लघवी करत असेल तर ते सामान्य आहे, पण जर यापेक्षा जास्त वेळा लघवी होत असेल तर ही चिंतेची गोष्ट आहे.
वारंवार लघवी होणे हे एन्झायटी (भीती), संसर्ग (इन्फेक्शन), मूत्रपिंडात खडे (स्टोन) किंवा कॅन्सर यांसारख्या गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला सतत लघवी होत असेल तर लघवीची चाचणी (युरिन टेस्ट) आणि अल्ट्रासाउंड करून घ्यावा. आजार लवकर ओळखला गेला तर मोठ्या त्रासापासून वाचता येते. चला, तर मग जाणून घेऊया की वारंवार लघवी होण्यामागे कोणते पाच आजार जबाबदार असतात.
मधुमेहामुळे होते वारंवार लघवी (Pee too much Reason)
डायबिटीज म्हणजेच मधुमेहाच्या आजारात वारंवार लघवी होते. जेव्हा रक्तातील साखरेचं प्रमाण खूप वाढतं, तेव्हा किडनीवर जास्त ग्लुकोज फिल्टर करण्याचा ताण येतो, त्यामुळे किडनी सतत लघवी फिल्टर करत राहते आणि वारंवार लघवी होते. खूप वेळा लघवी होणं याला पॉलीयुरिया असं म्हणतात. जर तुम्हाला सतत लघवी होत असेल, तर याकडे दुर्लक्ष करू नका आणि लगेचच ब्लड शुगरची तपासणी करून घ्या.
अतिक्रियाशील मूत्राशय (Urine too much Symptoms)
मूत्राशय खूप जास्त सक्रिय (ओव्हरॲक्टिव) झाल्यास वारंवार लघवी होण्याची समस्या होते. ही अशी स्थिती आहे, ज्यात ब्लॅडर सामान्यपेक्षा जास्त सक्रिय होतो आणि त्यामुळे सारखी लघवी होते.
UTI मुळे होऊ शकते लघवी
UTI म्हणजेच युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमुळे वारंवार लघवी होऊ शकते. UTI हे संक्रमण मूत्राशय, मूत्रमार्ग किंवा किडनीवर परिणाम करू शकते, ज्यामुळे सतत लघवी होते. UTI मुळे लघवी करताना जळजळ होणे आणि वारंवार लघवी होणे अशी समस्या होऊ शकते.
पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीचं वाढणं
पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यामुळे ती मूत्रमार्गावर दाब टाकते, त्यामुळे वारंवार लघवी होते आणि तणाव हे देखील जास्त लघवी येण्याचं कारण असू शकतं.
गर्भधारणेदरम्यान महिलांना वारंवार लघवी होऊ शकते…
महिलांना गर्भधारणेदरम्यान जास्त लघवी होऊ शकते. या काळात हार्मोन्समधील बदलांमुळेही लघवी जास्त होते. जर तुम्हाला सतत लघवी होण्याची समस्या होत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.