बेकिंग सोडा अनेक खाद्यपदार्थांमध्ये वापरला जातो. याबरोबर बेकिंग सोडा पिंपल्स घालवण्यासाठी देखील वापरला जाऊ शकतो, हे बऱ्याच जणांना माहित नसेल. रिसर्चनुसार बेकिंग सोडा हा अँटीफंगल, अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल अँटीइंफ्लेमेट्री गुणधर्म असणारा आहे. हे गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. पिंपल्सपासून सुटकारा मिळवण्यासाठी बेकिंग सोडा कोणत्या पद्धतीने वापरता येईल जाणून घेऊया.
बेकिंग सोडा वापरण्याची पद्धत
Health Tips : गरम पाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो जाणून घ्या
बेकिंग सोडा आणि मध
यासाठी तुम्हाला १ चमचा ऑरगॅनिक मध, १ चमचा बेकिंग सोडा आणि कोमट पाणी या गोष्टी लागतील. एका वाटीत बेकिंग सोडा आणि मध टाकून ही पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर किंवा फक्त पिंपल्स असतील त्या भागावर लावा. नंतर एक कापड कोमट पाण्यात बुडवून पिळून घ्या आणि ते चेहऱ्यावर ठेवा. थोडावेळ हे कापड चेहऱ्यावर असेच असु द्या. जेव्हा हे कापड थंड होईल तेव्हा त्याने चेहरा पुसून घ्या. नंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून त्यावर मॉइश्चरायझर लावा.
बेकिंग सोडा आणि एलोवेरा
एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा एलोवेरा जेल हे व्यवस्थित मिक्स करून त्याची पेस्ट बनवा. त्यानंतर ही पेस्ट पिंपल्सवर लावा. थोडा वेळ चेहऱ्यावर असू द्या. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून त्यावर मॉइश्चरायझर लावा.
बेकिंग सोडा, लिंबु आणि दही
पिंपल्सपासून सुटकारा मिळवण्यासाठी बेकिंग सोडा लिंबू आणि दह्याची क्रिमी पेस्ट बनवा. ही पेस्ट पिंपल्स असणाऱ्या भागात ५ ते १० मिनिटं लावुन ठेवा. नंतर चेहरा कोमट पाण्याने धुऊन त्यावर फेस सिरम किंवा मॉइश्चरायझर लावा.
Body Pain Causes : तुम्हाला सतत अंगदुखी जाणवते का? जाणून घ्या यामागचे कारण
बेकिंग सोडा आणि ॲप्पल साइडर विनेगर
ॲप्पल साइडर विनेगरमध्ये थोडे पाणी मिसळून पातळ करा. त्यानंतर यात बेकिंग सोडा मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर थोडा वेळ लावून ठेवा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन त्यावर मॉइश्चरायझर लावा.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)