फॅशन डिझायनिंग किंवा फॅशन याची सर्वसामान्य व्याख्या म्हणजे आकर्षक ड्रेस डिझायनिंग आणि त्या डिझाइनचे प्रदर्शन करणारे मॉडेल्स. आजची तरुणाइ ही अधिकतर फॅशन डिझाइनकडे वळताना दिसत आहे. आपली क्रिएटिव्हिटी आपण आपल्या डिझाइनमध्ये दाखवावे असा प्रत्येक विद्यार्थ्याचा अट्टाहास असतो. विद्यार्थी त्याप्रमाणे फॅशन इन्स्टिटयूटची निवड करतात. पण फॅशन डिझायनिंग हे फक्त कपडे डिझाइनपुरते मर्यादित न राहता त्याही पलिकडे जाऊन आपल्या क्रिएटिव्हिटीच्या जोरावर नवनवीन संकल्पना मांडू शकतो. शिक्षण क्षेत्रात सध्या आघाडीवर असलेल्या आयटीएम इन्स्टिटयूट ऑफ फॅशन डिझायनिंग आणि मीडियाचे विभाग प्रमुख मुकुंद राय यांनी फॅशन डिझाइनपलिकडे जात याच्या शिक्षणाबद्दल काही महत्वाच्या बाबी सांगितल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फॅशन डिझाइनमध्ये करियर करायचे असेल तर त्या शैक्षणिक वर्षात फक्त परीक्षा, असाइनमेन्ट, सबमिशन आणि डिग्री संपल्यावर ग्लॅमर जगात आपण एन्ट्री मारू असा समज फॅशन डिझाइन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा असतो. पण खरे पाहायला गेले तर अथक परिश्रम, ताण-तणाव आणि स्पर्धापूर्ण वातावरणाने भरलेलं असे फॅशन डिझाइनिंगचे शैक्षणिक वर्ष असते. २० वर्षांपूर्वी ‘फॅशन डिझायनिंग’ म्हणजे शानदार आणि महागड्या कपड्यांवर डिझाइन्स करणे अशी संकल्पना होती.

मात्र गेल्या दोन दशकात या संकल्पनेत बदल झालेला दिसत आहे. फॅशन डिझाइनचा शब्दशः अर्थ न घेता यातून वेगवेगळ्या क्षेत्रात आपण वळू शकतो हे फारसे कोणाला माहित नसते. या प्रकारात कॉस्ट्यूम स्टायलिस्ट किंवा डिझायनर, फॅशन बायर, व्हिज्युअल मर्चन्डायजर, फॅशन कन्सल्टंट किंवा उद्योजक अशा प्रकारची दालने आपल्यासाठी खुली आहेत.

आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण कोणत्याही क्षेत्रात झेप घेऊ शकतो. फॅशन इंडस्ट्रीमध्ये आपण याच डिजिटलायझेशन आणि क्रिएटिव्हिटीचा वापर करून इलेस्ट्रेटर, ग्राफिक डिझायनर बनू शकता. शिवाय फॅशन डिझायनिंग व्यतिरिक्त तुमच्यात लेखनशैली असेल तर तुम्ही फॅशन ब्लॉगर अथवा एखाद्या फॅशन मॅगझीनमध्ये संपादक होऊ शकता.

फॅशन इंडस्ट्री सध्या सर्वात वेगवान प्रगत होणारे क्षेत्र आहे. भारतात तरुणाईचा कल हा जास्तीत जास्त फॅशन आणि मीडियाकडे वळत आहे. एकविसाव्या शतकामध्ये फॅशन आणि मीडिया शिक्षणामध्ये झालेल्या आमूलाग्र बदलांमुळे विद्यार्थ्यांना करिअरच्या नवनवीन वाटा खुल्या झालेल्या आहेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Various scopes in fashion career apart from cloth designing