Home Remedies For Cough : पावसाळा, हिवाळा आणि अगदी उन्हाळ्यातही काही जणांना सर्दी होते. त्यामुळे अशी मंडळी सहसा थंड पाणी प्यायला, आईस्क्रीम किंवा दही, ताकासारखे थंड पेयसुद्धा पिणे टाळतात; कारण सर्दी झाली म्हणून सतत डॉक्टरकडे जाण्याचा आणि गोळ्या-औषधे खाण्याचा प्रत्येकाला कंटाळा आलेला असतो, त्यामुळे चार दिवसांत सर्दी कमी होईल म्हणून आपण कोणताही उपाय करत नाही.
जर तुम्हीही त्याचपैकी एक असाल तर आजचा व्हायरल होणारा व्हिडीओ फक्त तुमच्यासाठी आहे, कारण व्हिडीओत एका आजीने सर्दीवर जबरदस्त ५ घरगुती उपाय सांगितले आहेत; जे कदाचित सतत होणाऱ्या सर्दीसाठी रामबाण उपाय ठरू शकतील…
१. कोमट पाणी – कोमट पाण्याने कफ कमी होतो.
२. काढा – आले, हळद, तुळशीची पाने, लवंग, मिरे आदी साहित्य मिक्स करून काढा बनवा आणि दिवसातून दोनदा सेवन करा.
३. हळद, दूध, मध – एका ग्लासात हळदीचे दूध घ्या, त्यात चमचाभर मध घाला आणि रात्री झोपताना सेवन करा.
व्हिडीओ नक्की बघा…
४. मीठ आणि पाणी – कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या करा; यामुळे घशाची खवखव कमी होते.
५. सूप – तुमच्या आवडीचे गरमागरम सूप प्या.
या ५ उपायांबरोबरच आजीने हिरव्या पालेभाज्या, फळे खाण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर सर्दीमुळे नाक बंद होते, श्वास घ्यायला त्रास होतो, त्यामुळे हा त्रास वाफ घेतल्याने कमी होतो, नाक मोकळे होते. त्याचप्रमाणे सर्दी कमी होण्यासाठी शक्य तितका आराम करा, म्हणजे लवकर बरं होण्यासाठी मदत मिळेल असाही सल्ला आजीने व्हिडीओमध्ये दिला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @aapli_aaji या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.