Best Homemade Face Pack For Pimples : प्रत्येकाला आपली त्वचा अगदी मऊ, कोणतेही डाग नसणारी हवी असते. त्यासाठी प्रत्येकजण विविध उपाय करून पाहत असतो. कोणी फेसवॉश, तर कोणी पिंपल्स कमी करण्यासाठी औषध उपचारही करत असतो. मात्र आपण बाहेरचे तेलकट, तुपकट, चमचमीत असे जंक फूडसुद्धा खात असतात. त्यामुळे अनेकदा आपल्या चेहऱ्यावर तेलकटपणा, मुरुमं-पिंपल येतात; त्वचेच्या सतत काहीतरी समस्या उद्भवत असतात. अशा गोष्टींवर, नेमका काय उपाय करायचा हे मात्र आपल्याला समजत नाही. पण, आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये एका आजीने पिंपल्ससाठी जबरदस्त घरगुती फेसपॅक सांगितला आहे.
साहित्य
- २ चमचे बेसनचे पीठ
- १ चमचा दही
- १ चमचा मध
- हळद
कृती
- एका भांड्यात बेसनचे पीठ, दही, मध, हळद घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
- त्यानंतर मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यावर चेहऱ्याला लावा.
- १० ते १५ मिनिटे चेहऱ्यावर ठेवा.
- फेस पॅक सुकल्यावर चेहरा धुवून घ्या.
- यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात आणि चेहरा अगदी टवटवीत दिसतो.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @aapli_aaji या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा फेसपॅक तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. व्हिडीओ पाहून नेटकरी सुद्धा आम्ही हा उपाय नक्की करून बघू असे आवर्जून कमेंटमध्ये सांगताना दिसून आले आहेत.