स्मार्टफोन निर्माती कंपनी Vivo ने महिन्याभरापूर्वीच भारतात लाँच केलेला स्मार्टफोन Vivo V17 Pro च्या किेंमतीत कपात केली आहे. या स्मार्टफोनच्या किंमतीत दोन हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सल क्षमतेचा ड्युअल पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे. दोन पॉप-अप सेल्फी कॅमेरे असलेला हा जगातील पहिलाच स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यातील एक कॅमेरा 32 मेगपिक्सल क्षमतेचा, तर दुसरा 8 मेगापिक्सल क्षमतेचा आहे. एकूण सहा कॅमेरे या स्मार्टफोनमध्ये आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 6 –
Vivo V17 Pro स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 675 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. तसंच यामध्ये ‘कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 6’ चा वापर करण्यात आला आहे. 4,100 mAh क्षमतेची बॅटरी असलेल्या या फोनमध्ये 6.44 इंचाचा सुपर एमोलेड फुल HD+ डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन ग्लेशियर ब्ल्यू आणि मिडनाइट ओशिअन कलरमध्ये उपलब्ध असेल. Android 9 Pie वर आधारित हा स्मार्टफोन Funtouch OS 9 वर कार्यरत असेल. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर हे फीचर देखील आहे.

किंमत –
दोन हजार रुपयांची कपात झाल्याने 27,990 रुपयांना Vivo V17 Pro खरेदी करता येईल. लाँचिंगवेळी याची किंमत 29 हजार 990 रुपये होती. ही किंमत 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी आहे. Vivo V17 Pro मध्ये मागील बाजूला असलेल्या चार कॅमेऱ्यांपैकी मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सल क्षमतेचा आहे. यामध्ये AI सुपर नाइट मोड हे फीचर देखील आहे. याशिवाय मागील बाजूचे अन्य कॅमेरे अनुक्रमे 13, 8 आणि 2 मेगापिक्सल क्षमतेचे आहेत.

 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivo v17 pro price cut in india know all features and price sas