टेलिकॉम कंपनी व्होडाफोनने एक नवा प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. हा नवा रिचार्ज प्लॅन 299 रुपयांचा असून दोन दिवसांपूर्वीच कंपनीने 229 रुपयांचा प्लॅन देखील लाँच केला आहे. 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना तब्बल 70 दिवसांची वैधता मिळेल. या दरम्यान ग्राहकांना मोफत अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉल्सची सुविधा मिळेल. इंटरनेट डेटाबाबत सांगायचं झाल्यास 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 3 जीबी डेटा वापरता येईल. महत्त्वाचं म्हणजे 3 जीबी डेटा दररोज वापरण्यासाठी मिळणार नसून संपूर्ण 70 दिवसांच्या वैधतेपर्यंत हा डेटा वापरावा लागेल. अर्थात, इंटरनेटचा कमी आणि कॉलिंगचा अधिक वापर करणाऱ्यांचा विचार करुन कंपनीने हा प्लॅन आणला आहे. तसंच या प्लॅनमध्ये 1000 एसएमएस देखील वापरायला मिळतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यापूर्वी सोमवारी(दि.3) कंपनीने 229 रुपयांचा प्रीपेड प्लॅन लाँच केला होता. या प्लॅनमध्ये 299 रुपयांच्या प्लॅनच्या तुलनेत अधिक इंटरनेट डेटा वापरण्यासाठी मिळतो, मात्र केवळ 28 दिवसांची वैधता आहे. दररोज ग्राहकांना 2जीबी इंटरनेट डेटाचा वापर करता येईल, अर्थात एकूण 56 जीबी इंटरनेट डेटा ग्राहकांना मिळेल. याशिवाय या प्लॅनमध्ये अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलिंगची सुविधा देखील आहे. तसंच दररोज 100 एसएमएस देखील करता येतील. 229 रुपयांच्या या प्लॅनमध्ये युजर्सना व्होडाफोन प्ले अॅपचा मोफत अॅक्सेस मिळेल. म्हणजेच ग्राहक लाइव्ह टीव्ही, चित्रपट आणि अन्य अनेक कार्यक्रम व्होडाफोन प्लेवर मोफत पाहू शकतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vodafone 299 prepaid recharge plan launched