भारतीय टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक रिचार्ज ऑफर घेऊन येत असतात. ज्यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा, फ्री कॉलिंग आणि अनेक OTT अॅप्सचे सबस्क्रिप्शन दिले जाते. तुम्हीही अशाच प्रकारच्या फायद्यांसह रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तर तुमच्यासाठी काही निवडक रिचार्ज प्लॅन आहेत, जे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. यामध्ये तुम्हाला दररोज एक जीबी पेक्षा जास्त डेटा दिला जातो आणि त्यांची किंमत ४०० रुपयांपेक्षा कमी आहे. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल..
एअरटेलचा ३९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
एअरटेलच्या या डेटा पॅकची वेळ मर्यादा ५६ दिवसांची आहे. यामध्ये दररोज १.५ जिबी डेटा आणि १०० एसएमएस (SMS) ऑफर केले जातात. यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय डेटा पॅकमध्ये Amazon Prime, Wink Music आणि Free Hello Tune चे सबस्क्रिप्शन देखील दिले आहे. याशिवाय, जर तुम्ही २९९ रुपयांचा प्लॅन घेतला तर तो २८ दिवसांच्या कालावधीसह येतो. यामध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग सुविधेसह अतिरिक्त ५०० एमबी डेटा दिला जातो. याव्यतिरिक्त, तुम्हाला Amazon चे ३०-दिवसांचे सबस्क्रिप्शन दिले जाते.
Vi चा २९९ आणि ३९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
Vodafone Idea च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये डबल डेटा ऑफर उपलब्ध आहे. या प्लॅन अंतर्गत तुम्हाला आणखी एक ऑफर दिली जाते, यामध्ये दोन जीबी डेटा अतिरिक्त दिला जातो. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, वापरकर्त्यांना या पॅकमध्ये अमर्यादित कॉलिंगसह Vi Movies, Live TV, Binge All Night आणि Weekend डेटा रोलओव्हर दिला जातो. या पॅकची वेळ मर्यादा २८ दिवस आहे. त्याच वेळी, ३९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग १.५ जिबी एक दिवसाचा डेटा आणि १०० एसएमएस दिले जातात. हे ५६ दिवसांच्या वैधतेसह येते. या प्लॅनमध्ये Vi च्या सर्व सेवा देखील दिल्या आहेत.
तुम्हाला OTT अॅप्ससह अमर्यादित डेटासह रिचार्ज योजनांचे सदस्यत्व घ्यायचे असल्यास, तुम्ही या टेलिकॉम कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला या योजनांची तपशीलवार माहिती दिली आहे.