How to Postpone Menstrual Date: कौटुंबिक मेळावे, सुट्टी किंवा सहलीचे नियोजन करताना बहुतेक मुली किंवा महिला मासिक पाळी पुढे ढकलण्याचा विचार करतात. मासिक पाळी पुढे ढकलली तर, महत्वाच्या असलेल्या कार्यक्रमांना त्यांना हजेरी लावता येते. मासिक पाळी पुढे जावी यासाठी अनेक महिला किंवा मुली केमिकल टॅब्लेट्स वैगरे घेतात. मात्र, प्रत्येकवेळी मासिक पाळी पुढे-मागे ढकलण्यासाठी गोळ्या खाणं चांगलं नसतं. याने तुमच्या तब्बेतीवर परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला देखील अशीच समस्या असेल आणि तुम्ही गोळ्या पुन्हा पुन्हा खाणे तुम्हाला नको असेल, तर काही नैसर्गिक मार्गाने देखील तुम्ही तुमची मासिक पाळी पुढे ढकलू शकता. तर जाणून घेऊया असे काही नैसर्गिक मार्ग ज्यामुळे तुम्हाला तुमची मासिक पाळी पुढे ढकलता येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१) ऍपल सायडर व्हिनेगर

ऍपल सायडर व्हिनेगर विलंबित मासिक पाळीसाठी एक प्रभावी नैसर्गिक उपाय आहे तसंच हा पीएमएस लक्षणांपासून देखील आराम देतो. यासाठी सफरचंद सायडर व्हिनेगर पाण्यात विरघळवून घ्या आणि मासिक पाळी सुरू होण्याच्या तारखेच्या किमान एक आठवडा आधी प्या. मासिक पाळी येण्याच्या एक आठवडा दररोज सकाळी याचे सेवन केल्याने तुमची मासिक पाळी पुढे जाईल.

( हे ही वाचा: मासिक पाळी वेळेत येत नाही? या पाच सवयी बदलून पाहा…)

२) लिंबाचा रस

मासिक पाळीला उशीर करण्यासाठी लिंबाचा रस
हा सर्वात जुना मार्ग आहे. मासिक पाळीची तारीख वाढवण्यासाठी लिंबाचा रस मध्यम प्रमाणात घ्या. मात्र, आंबट पदार्थ रक्तस्त्राव कमी करण्यास मदत करतात असा कोणताही वैद्यकीय पुरावा नाही. जर तुम्ही हा उपाय वापरून पहात असाल तर एका ग्लास पाण्यात दोन चमचे लिंबाचा रस मिसळा आणि हा रस मासिक पाळी येण्याच्या १ आठवडा आधी प्या. तुम्हाला फायदा मिळेल.

३) जिलेटीन

मासिक पाळीच्या तारखेच्या ३ ते ४ दिवस आधी दिवसातून एकदा जिलेटिनचे पाणी प्या, हा एक चमत्कारिक उपाय आहे ज्यामुळे मासिक पाळी काही काळ लांबू शकते. तथापि, जिलेटिनचे जास्त सेवन केल्याने आम्लपित्त आणि पोट फुगणे होऊ शकते. त्यामुळे पित्ताचा त्रास असल्यास, हा उपाय करू नये.

( हे ही वाचा: वयाच्या ३० वर्षांनंतर प्रत्येक महिलेने ‘या’ ५ चाचण्या करायला हव्यात; जाणून घ्या माहिती)

४) हरभर्‍याच्या डाळ

यासाठी हरभऱ्याची डाळीची बारीक पावडर बनवा आणि दररोज कोणत्याही सूपमध्ये २ चमचे घाला. मासिक पाळीच्या तारखेच्या १० दिवस आधी या मिश्रणाचे सेवन करा. हे सूप फक्त काही दिवसांसाठी कमी प्रमाणात घेण्याचे लक्षात ठेवा, परंतु जर तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम दिसले तर ते बंद करा.

५) दालचिनी

दालचिनीचा चहा मासिक पाळी लांबण्यास मदत करतो. कोणताही दुष्परिणाम नसलेला हा चमत्कारिक उपाय आहे. दालचिनीचा चहा छान लागतो, चवदार आणि आरोग्यदायीही असतो. मासिक पाळी येण्याच्या १० दिवस आधी या काढ्याचे सेवन करा म्हणजे त्याचा फायदा होईल.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Want to postpone the date of menstruation follow these natural remedies you will surely get benefit gps