अनेकांना चिंच खुप आवडते. आंबट-गोड चिंच पाहिल्यावर लगेचच तोंडाला पाणी सुटते. काहीजण तर अमर्यादित प्रमाणात भरपुर चिंच खातात, पण यामुळे शरीरावर काय परिणाम होऊ शकतो याची बहुधा त्यांना कल्पना नसावी. तसेच काही व्यक्तींना चिंच टाळण्याचा सल्ला दिला जातो. चिंच खाणे कोणी टाळावे आणि त्यामागे काय कारण आहे जाणून घ्या.

आणखी वाचा: रोज चष्मा वापरल्याने नाकावर डाग पडले आहेत? ‘हे’ घरगुती उपाय वापरून मिळवा त्यापासून सुटका

या व्यक्तींनी चिंच खाणे टाळावे

  • ज्या लोकांना दातासंबंधी सतत समस्या असतात, त्यांनी जास्त प्रमाणात चिंच खाणे टाळावे. कारण चिंच खाल्ल्याने दातांच्या समस्या वाढू शकतात किंवा दातांचे इनॅमल देखील खराब होऊ शकते.
  • जास्त प्रमाणात चिंचेचे सेवन केल्यास ऍलर्जीची समस्या उद्भवू शकते. जास्त चिंच खाल्यास शरीराला खाज येणे, सुज येणे, उलट्या होणे, चक्कर येणे या समस्या उद्भवू शकतात.
  • चिंचेमध्ये ऍसिडिक आढळते ज्यामुळे पचनक्रियेशी निगडित समस्या उद्भवण्यासह, पोट फुगण्याचा त्रासही होऊ शकतो. ज्या व्यक्तींना आधीच पोटाशी निगडित समस्या आहेत, त्यांनी चिंच खाणे टाळावे, कारण हे अतिप्रमाणात खाल्ल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो.
  • गरोदरपणात किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी जास्त प्रमाणात चिंच खाणे टाळावे, कारण यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)