आज प्रत्येकच वयोगटातील व्यक्ती आपापल्या मतानुसार गुगलवर काही ना काही सर्च करत असते. नुकतेच गुगलने मुली किंवा महिला इंटरनेटवर काय शोधत असतात, याची माहिती दिली आहे. गुगलने प्रसिद्ध केलेला हा अहवाल १५ ते ३४ वयोगटातील महिलांबाबत आहे. या मुली किंवा महिला गुगलवर सर्वात जास्त काय सर्च करतात, हे गुगलने अहवालात सांगितले आहे. चला जाणून घेऊया या मुली किंवा महिला इंटरनेटवर काय जास्त प्रमाणात शोधतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सौंदर्याशी निगडीत टिप्स- आपण सुंदर दिसावं यासाठी महिला या कायमंच सजग असतात. त्यामुळे कोणती सौंदर्य प्रसाधने घ्यावीत, तसेच नितळ कांतीसाठी घरगुती उपाय कोणते आहेत याबाबत महिला इंटरनेटवर सर्च करतात.

करीअरशी संबंधित गोष्टी – आपल्या करिअरच्या बाबतही मुली फारच चोखंदळ असतात. त्यामुळे करिअर ऑप्शन्स सर्च करणा-या मुलींची संख्या सर्वाधिक असल्याचे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

आणखी वाचा : विवाहपूर्व मार्गदर्शन : सेक्स्च्युअल शेअरिंग म्हणजे काय गं?

ऑनलाइन खरेदी- शॉपिंग हा महिलांचा आवडता विषय आहे. त्यामुळे कुठलीही वस्तू घेताना महिला त्याबाबत योग्य तो रिसर्च घेतात. किंमतींच्या बाबतीत घासाघीस करण्यामध्येही महिला तरबेज असतात. त्यामुळे कोणत्या वेबसाईटवर ऑफर्स आहेत, कुठे डिस्काऊंट आहे याची माहितीही महिला इंटरनेटवर शोधतात.

गर्भधारणा आणि मासिक पाळी प्रत्येक मुलीला गरोदर राहण्याची भीती वाटत असते परंतु पुरेसे लौगिक शिक्षण नसल्याने अनेकींच्या मनात विविध प्रश्न असतात नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांची माहिती इंटनेटवरून मिळवली जाते तसेच पाळी उशिरा आल्यास काय करावे, असेही अनेक प्रश्न असतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What do girls search on the internet google has given the information pdb
First published on: 29-09-2022 at 12:55 IST