Naphthalene balls for clothes: कडक सूर्यप्रकाशासह आता हिवाळ्या संपून उन्हाळा ऋतुला सुरुवात होत आहे. त्यामुळे आता लोकरीच्या कपड्यांची तितकीशी गरज भासत नाही, अशा परिस्थितीत लोक थंडीचे जाड उबदार कपडे धुवून ड्राय क्लीन करून व्यवस्थित पॅक करुन ठेवत आहेत. अशाप्रकारचे कपडे पॅकिंग करुन कपाटात ठेवताना त्यात नॅफथलीनच्या गोळ्या ठेवल्या जातात. पण तुम्हाला माहित आहे का की, नॅपथलीनच्या गोळ्या कपड्यांमध्ये का ठेवल्या जातात आणि त्या ठेवण्याची योग्य पद्धत कोणती? नसेल, तर चला सविस्तर जाणून घेऊ…

कपड्यांमध्ये नॅपथलीन गोळ्या ठेवल्यास काय होते?

नॅपथलीनच्या गोळ्यांमध्ये काही केमिकल्स असते. जे अँटीबॅक्टेरिया आणि अँटीफंगल गुणधर्मांचे असतात. या गोळ्या हवेच्या संपर्कात येताच विरघळू लागतात आणि कपड्यांमध्ये ओलाव्यामुळे निर्माण होणारा वास कमी करतात. याशिवाय कपड्यांचे पांढरी बुरशी किंवा गंज अशा सर्व प्रकारच्या नुकसानांपासून संरक्षण करण्याचे काम या गोळ्या करतात. त्यामुळे आजही अनेकजण कपडात या गोळ्या ठेवतात.

आयफोन वापरणाऱ्यांनो चार्जिंग करताना काळजी घ्या; अन्यथा तुमच्याबरोबरही घडू शकते ‘ही’ घटना, पाहा Video

विशेष बाब म्हणजे रेशीम आणि सुती कपड्यांमध्ये छोटे तंतू किंवा किड्यांचा प्रादुर्भाव रोखतात. नॅपथलीन गोळ्या एक तीव्र गंध उत्सर्जित करून कपड्यांपासून लहान मोठ्या किटकांना दूर ठेवतात. तसेच किटकांना कपड्यांवर अंडी घालण्यापासून प्रतिबंधित करतात.

नॅपथलीनचा वापर कशासाठी केला जातो?

लोकरीचे कपडे, स्नानगृहे, शौचालये आणि मूत्रालय इत्यादींमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी नॅपथलीन गोळ्या मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात.

कपड्यांमध्ये नॅपथलीन गोळ्या ठेवण्याची योग्य पद्धत कोणती?

बहुतेक लोक त्यांच्या कपड्यांमध्ये नॅपथलीनच्या गोळ्या अशाच ठेवतात. पण ही पद्धत चुकीची आहे. तुम्ही नॅपथलीनच्य गोळ्या रुमाला एवढ्या आकाराच्या छोट्या कपड्यांमध्ये बांधून मग त्या कपड्यांमध्ये ठेवाव्यात. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमधील विविध कप्प्यांमध्ये त्या अशाच पद्धतीने ठेवू शकता.