योगगुरु बाबा रामदेव आपल्या योगविद्येसाठी कायमच चर्चेत असतात. हा त्यांच्या काही योगप्रकारामुळे काहीवेळा त्यांच्यावर हशा पिकतो, तर कधी त्यांच्यावर टीकाही होताना दिसते. असे असले तरीही त्यांच्या योगापद्धतीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. कारण सामान्यांपर्यंत योग पोहोचवण्याचे काम त्यांनी केले हे नक्की. त्यांच्या योगातील काही प्रकारांमुळे अनेकदा उपस्थितांमध्ये हशा पिकतो अनेक जण त्यांच्यावर विनोद करतात, मात्र त्यांची प्रसिद्धी तसूभरही कमी झालेली नाही.

पारंपरिक योग पद्धती आणि त्याचा आताच्या काळात होणारा उपयोग, गरजेनुसार योगामध्ये झालेले बदल आणि धकाधकीच्या जीवनात योगाचा होणारा फायदा बाबा रामदेव आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगतात. ते केवळ भाषणातून सांगतातच असे नाही तर प्रत्येक आसन प्रत्यक्षपणे आपल्याला करुन दाखवतात. त्यांच्या आसन करण्यातील सुलभतेचे आपल्याला आश्चर्य़ तर वाटतेच पण त्या आसनाचे महत्त्व पटण्यासही मदत होते. त्यांचे असेच काही व्हिडिओ एका वाहिनीवर दाखविण्यात आले असून योग दिवसाच्या निमित्ताने रामदेव बाबांचे काही निवडक व्हिडिओ.

 

 

(व्हिडिओ सौजन्य – आस्था वाहिनी)