Couple Relationship Best Tips : रिलेशनशिपला मजबूत करण्यासाठी पार्टनर सकारात्मक असणं, अत्यंत महत्वाचं असतं. पण तुम्ही तुमच्या जोडीदाराला नेहमीच निराशाजनक आणि कंटाळवाण्या गोष्टी सांगत असाल, तर अशा वागणुकीचा थूप वाईट परिणाम तुमच्या रिलेशनशिपवर होऊ शकतो. अशातच तुमचा जोडीदार खूपच कंटाळवाणा नकारात्मक असेल, तर आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण या जबरदस्त टीप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या रिलेशनशिपला इंट्रेस्टिंग बनवू शकता. कपल्स त्यांच्या रिलेशनशिपला खास बनवण्यासाठी खूप प्रयत्न करतात. पण अनेकवेळा जोडीदाराचा नकारात्मक आणि कंटाळवाणा स्वभाव रिलेशनशिपमध्ये दुरावा निर्माण करतो. अशा परिस्थितीत काही सोप्या उपायांच्या मदतीनं तुम्ही जोडीदाराचा माइंड सेट सकारात्मक करु शकता. एव्हढच नाही तर तुमच्या रिलेशनशिपला अजून चांगलं बनवू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या पद्धतीने डेट प्लॅन करा

काही लोक जोडीदाराला खूश करण्यासाठी रात्रीची डेट प्लॅन करतात. पण नेहमी नाईट डेटला जाणं थोडं कंटाळवाणं वाटू लागतं. अशा परिस्थितीत तुम्ही थोड्या वेगळ्या डेटिंगसाठी जाण्याचं प्रयत्न करु शकता. ज्यामुळे जोडीदारालाही नवनवीन सरप्राइज मिळत राहतील आणि प्रत्येक वेळी जोडीदाराला वेगळाच आनंद प्राप्त होईल.

मित्रांना महत्व द्या

अनेक वेळा कपल्स त्यांना स्वत:ला जास्त वेळ देता यावा, यासाठी मित्रांकडे दुर्लक्ष करतात. अशावेळी सतत जोडीदारासोबत राहिल्यावर तुम्हाला कंटाळा येतो. त्यामुळे रिलेशिपसोबतच मित्रमंडळींनाही प्राधान्य द्या. जोडीदारालाही थोडा वेळ मित्रांसोबत घालवण्यासाठी सल्ला द्या. यामुळे त्याचा मूड फ्रेश आणि रिलॅक्स राहील.

नक्की वाचा – Video: दुचाकीवरून आई-वडील खाली पडले, पण टाकीवर बसलेला लहान मुलगा अर्धा KM पर्यंत तसाच पुढे जातो अन्…

जोडीदाराला ग्रुपमध्ये सामील करा

जर तुमचा फ्रेंड सर्कल खूप मस्ती आणि खेळीमेळीच्या वातावरणात राहणार असेल, तर तुमच्या जोडीदारालाही अशा ग्रुपमध्ये सहभागी करुन घ्या. यामुळे जोडीदार सुद्धा जास्तीत खूश राहण्याचा प्रयत्न करेल आणि हळूहळू नकारात्मकतेपासून दूर होईल.

नेमकं कारण शोधा

जोडीदाराचा कंटाळवाणा आणि नकारात्मक स्वभाव बदलण्याआधी त्यामागचं कारण जाणून घ्यायचा प्रयत्न करा. तुमचा जोडीदार काही गंभीर गोष्टींमुळे नकारात्मकतेकडे वळला असण्याची शक्यता असू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही जोडीदारासोबत संवाद साधून त्याचे दु:ख दूर करू शकता.

सर्वांकडून मदत घ्या

जोडीदाराचा नकारात्मकता आणि कंटाळवाण्या स्वभावाला बदलण्यासाठी तुम्ही आजूबाजूच्या लोकांची मदत घेऊ शकता. अशा परिस्थितीत कुटुंबीयांना आणि मित्रमंडळीला जोडीदारासमोर सकारात्मक गोष्टी बोलण्याचा सल्ला द्या. यामुळे जोडीदाराचा माइंड सेटही सकारात्मक होईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You can change your partner boring and negative behavior follow these best tips for good relationship nss