डान्स वर्कआऊटमधील सर्वश्रूत असा प्रकार म्हणजे ‘झुंबा’ तुम्ही या डान्सप्रकाराबद्दल नक्कीच ऐकले असेल. झुंबा हा प्रकार पाश्चिमात्य वर्कआऊटचा प्रकार आहे. झुंबा डान्स हा एक एरोबिक्स डान्स प्रकार आहे. पण हल्ली यावर बॉलिवूडची गाणी लावली जातात आणि डान्स केला जातो. या वर्कआऊटमध्ये तुमचे हात, पाय आणि कंबर यांची योग्यपद्धतीने हालचाल केली जाते. इतर व्यायामांपेक्षा ते अधिक फायदेशीर आहे. यामुळे स्नायू टोन होतात, चरबी कमी होते आणि कॅलरी बर्न करण्यास मदत होते. त्यामुळे झुंबा वर्कआउट किती फायदेशीर आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.
झुंबा डान्स वर्कआउटचे ४ उत्तम फायदे
झुंबा डान्स वर्कआउटमध्ये बेली डान्स, साल्सा, हिप-हॉप इत्यादी सर्व नृत्यशैलींच्या डान्स स्टेप्सचा समावेश केला जातो. जे केल्याने तुमच्या शरीराला त्याचे फायदे होतात.
स्नायूंची ताकद वाढते
जेव्हा तुम्ही झुंबा वर्कआउट करता तेव्हा शरीराची हालचाल वेगाने होते. स्नायूंना चांगला रक्तपुरवठाही होतो आणि ते मजबूत होतात. काही आठवड्यांत तुम्हाला झुंबा वर्कआउट्सचे फायदे पाहायला मिळतील.
तणाव कमी होतो
झुंबा हा एक डान्स वर्कआउट आहे जो तुमच्या शरीराला फील-गुड हार्मोन सेरोटोनिनचे उत्पादन वाढवण्यास मदत करतो. याने तुमचा मूड चांगला रहण्यास मदत होतो. त्यात तुमचा ताण कमी होईल.
रक्तदाब सुधारतो
झुंबा वर्कआउट केल्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते आणि रक्तवाहिन्या निरोगी राहतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांमधून रक्तप्रवाह बरोबर होतो. यामुळे जर तुम्हाला रक्तदाबाची समस्या असेल तर ती कमी होते.
कॅलरीज बर्न करण्यास मदत होते
जेव्हा तुम्ही झुंबा डान्स वर्कआउट करता तेव्हा शरीराचे सर्व स्नायू सक्रिय होतात आणि हृदयाचे ठोके वाढतात. त्यामुळे हा कार्डिओ वर्कआउट मानला जातो. एका अंदाजानुसार, ४० मिनिटांचा झुंबा वर्कआउट करून सुमारे ३७० कॅलरीज बर्न केल्या जाऊ शकतात.