• कोकमाच्या फळावरच्या सालीला आमसूल म्हणतात. रोजच्या जेवणात सहाही रस योग्य प्रमाणात पोटात जाणे आवश्यक असते. आंबट रसाची पूर्तता व उत्तम पाचक म्हणून आपल्याकडे कोकमाचा वापर रोज करतात.
  • पोटात मुरडून, कुंथून पांढरी किंवा रक्ती आंव थोडय़ाशा मळाबरोबर वारंवार पडते, यामध्ये तहान, थकवाही वाढतो. यात कोकमाच्या बियांपासून तयार केलेले कोकम तेल उत्कृष्ट काम करते.
  • या शरद ऋतूत होणाऱ्या पित्त प्रकोपात अंगावर पुरळ उठणे, त्याला फार खाज सुटणे, त्वचा लाल व गरम होणे असा ‘शीतपित्त’ विकार बळावतो. यात आमसूल पाण्यात कुस्करून त्यात कापूर व मिरपूड घालून त्वचेवर चोळावे किंवा आमसुले तासभर पाण्यात भिजवून त्या पाण्यात साखर-मीठ घालून प्यावे.
  • जखमा भरणे, खाज कमी करणे या गुणांमुळे अनेक मलमांमध्ये आमसुलाच्या बियांचे तेल वापरतात.
  • उष्णता कमी करणे, अशक्तपणा, मानसिक ताण, संध्याकाळपर्यंत येणारा थकवा कमी करण्यासाठी सोडायुक्त शीतपेयांपेक्षा कोकम सरबत प्यावे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kokam fruit