भरली केळी

साहित्य : सहा पिकलेली केळी, एक वाटी खोवलेले ओले खोबरे, अर्धी वाटी साखर, वेलची पावडर, चार चमते तूप
कृती : केळ्यांचे मोठे तुकडे करून ते तुपावर एका भांडय़ात घालून गॅसवर ठेवावे. लगचेच त्यात ओले खोबरे, साखर व वेलची पावडर घालून परतावे. भरली केळी तयार.

केळफुलाचे वडे

साहित्य : बारीक चिरलेले एक वाटी केळफूल, एक वाटी तांदळाचे पीठ, एक वाटी कणिक, एक लहान पळी मोहनासाठी तेल, एक चमचा साखर, दोन चमचे धने-जिरे पावडर, एक चमचा लाल तिखट, तळण्यासाठी तेल.
कृती : केळफूल वाफवून घ्यावे. सर्व साहित्य एकत्र करून पीठ मळावे व थापून वडे तळावेत.
टीप : पीठ मळताना थोडे पाणी घालावे. पिठाचे प्रमाणे थोडे कमी-जास्त झाले तरी चालेल.

केळफुलाचे उपवासाचे कटलेट

साहित्य : बारीक चिरलेले व वाफवलेले एक वाटी केळफूल, दोन उकडलेले बटाटे, एक वाटी सुरणाचा वाफवलेला कीस, अर्धा चमचा जिरेपूड, एक चमचा साखर, एक चमचा लाल तिखट, शिंगाडय़ाचे पीठ एक वाटी, थोडेसे तेल किंवा तूप.
कृती : सर्व साहित्य एकत्र करून पीठ मळावे व आवडीच्या आकाराचे कटलेट बनवून तव्यावर तेल किंवा तूप सोडून शॅलो फ्राय करावे.

पिकलेल्या केळ्याची गोड तिखट भजी

साहित्य : पिकलेल्या केळ्याचे काप, चणाडाळीचे पीठ (बेसन), लाल तिखट अर्धा चमचा किंवा चवीनुसार, मीठ चवीप्रमाणे, तळण्यासाठी तेल
कृती : चणाडाळीचे पीठ, लाल तिखट व मीठ घालून भज्यांचे पीठाप्रमाणे पीठ भिजवावे. केळ्याचे काप त्यातून काढून भजी तळावीत.
ही भजी गोड व तिखट अशा संमिश्र चवीची लागतात.
सृजा कर्वे – response.lokprabha@expressindia.com