वृत्तछायाचित्रण नेमके कशाशी खातात आणि चांगले व्यावसायिक वृत्तछायाचित्रण म्हणजे काय, या दोन्ही बाबी समजून घ्यायच्या असतील तर ब्रुक्स क्राफ्ट समजून घ्यावा लागेल. टाइम, वॉल स्ट्रीट जर्नल, लाइफ, बिझनेस वीक, व्हॅनिटी फेअर, एनबीसी न्यूज, सीएनएन, फ्रंटलाइन, सोर्स मीडिया, कोस्टल लाइफ ही जगप्रसिद्ध वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके वाचणाऱ्यांसाठी किंवा चॅनल्स पाहणाऱ्यांसाठी ब्रुक्स क्राफ्ट हे नाव तसे नवीन नाही. कदाचित तुम्ही त्याला चेहऱ्याने ओळखत नसाल किंवा मग छायाचित्रांखालचे छायाचित्रकाराचे नाव पाहण्याची सवय नसेल तर नावही प्रथमच ऐकत असाल. पण छायाचित्रे सांगितली की, निश्चितच ओळख पटेल. मध्यंतरी जगप्रसिद्ध टाइम साप्ताहिकाने एक फोटो प्रसिद्ध
त्याचे आणखी एक छायाचित्र त्याला या पुरस्काराप्रत नेण्यास कारण ठरले. बराक ओबामांचे ते छायाचित्र त्याने गेल्या वर्षी पार पडलेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या प्रचारादरम्यान टिपले होते. या प्रचारादरम्यान टिपलेली सर्व छायाचित्रे ही कृष्णधवल आहेत. आणि ती पाहिल्यानंतर लक्षात येते की, त्या कृष्णधवल रंगांमध्येच ती जबरदस्त परिणामकारक ठरतात. त्याबद्दलही छायाचित्रकाराचे कौतुक करावे तेवढे थोडेच. त्याची ही संपूर्ण मालिका ब्रुक्सच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यात अनेक प्रभावी छायाचित्रे आहेत. ही
ब्रुक्सने त्याच्या राजकीय चित्रणादरम्यानही अनेक आगळे क्षण टिपले आहेत. त्यात बिल आणि हिलरी िक्लटन यांचे तोंडावर बोट ठेवत कुणाला तरी ‘गप्प बसा’ असे सांगतानाचे एक वेगळे छायाचित्र आहे. बहुधा ते मुलांसोबतचे असावे. पण क्षण एकदम वेगळा आहे.
खरेतर ओबामांच्या व्यक्तिचित्रणातून आपल्याला तो उत्तम व्यक्तिचित्रण करणारा असल्याचे कळलेले असते, पण त्याच्या प्रोफाइलमधील व्यक्तिचित्रे पाहिली की तो किती माहिर आहे, याचाही प्रत्यय येतो. ब्रुक्स वेगळा ठरतो कारण वेगळे टिपायाचे म्हणजे काय करायचे हे त्याला पक्के ठाऊक आहे. म्हणूनच जेव्हा इतर मंडळी इंद्रधनुष्य टिपण्यासाठी केवळ त्यावर लक्ष केंद्रित करतात, तेव्हा ब्रुक्स इंद्रधनुष्य टिपतो ते त्याकडे उत्सुकतेने पाहणाऱ्या पाठमोऱ्या भाऊबहिणीच्या बरोबर मधून!
संग्रहित लेख, दिनांक 22nd Nov 2013 रोजी प्रकाशित
नाटय़ात्म व प्रभावी!
<span style="color: #ff0000;">चित्रकथी</span><br />वृत्तछायाचित्रण नेमके कशाशी खातात आणि चांगले व्यावसायिक वृत्तछायाचित्रण म्हणजे काय, या दोन्ही बाबी समजून घ्यायच्या असतील तर ब्रुक्स क्राफ्ट समजून घ्यावा लागेल.
First published on: 22-11-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Press photography