डोकं लढवा

१. एका बसमध्ये पहिल्या स्टॉपवर २४ प्रवासी होते. त्यानंतरच्या थांब्यावर बसमध्ये १४ प्रवासी चढले व ५ उतरले. पुढच्या स्टॉपवर चढलं कोणीच नाही मात्र ११ प्रवासी उतरले.

१. एका बसमध्ये पहिल्या स्टॉपवर २४ प्रवासी होते. त्यानंतरच्या थांब्यावर बसमध्ये १४ प्रवासी चढले व ५ उतरले. पुढच्या स्टॉपवर चढलं कोणीच नाही मात्र ११ प्रवासी उतरले. त्यानंतरच्या थांब्यावर १३ प्रवासी चढले व ८ उतरले आणि शेवटच्या थांब्यावर ५ प्रवासी चढले. शेवटी बसमध्ये २३ प्रवासी उरले असतील तर शेवटच्या स्टॉपवर उतरलेल्या प्रवाशांची संख्या व बसचे एकूण थांबे किती?

२. एका वर्तुळाची परिमिती ४४ सेंटिमीटर आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती?

३. संकेत रोज दोन किलोमीटर चालतो. त्याला ते अंतर कापण्यासाठी सुरुवातीस अर्धा तास लागला. नंतर दररोज अर्धा मिनीट कमी कमी लागत गेले. एका दिवशी तो २० मिनिटांत ते अंतर चालला तर तो संकेतचा चालण्याचा कितवा दिवस होता?

४. एका बाटलीमध्ये पाच लीटर तयार केलेले सरबत आहे. सरबत तयार करावयाच्या नियमाप्रमाणे त्यात दोन पंचमांश सरबत व तीनपंचमांश पाणी घालून ते सव्र्ह करायचे असते. तर सरबतातील पाण्याचा अंश किती?

५. सचिनने तीन सामन्यांमध्ये ४३, ८२ आणि नाबाद १०३ धावा काढल्या. त्यानंतरच्या मालिकेतही त्याने धावांचा पाऊस पाडला. त्याने सात सामन्यांमध्ये एकूण ७७३ धावा दोनदा नाबाद राहत काढल्या. तर सचिनची सरासरी किती?

उत्तरे :
१) उतरलेले प्रवासी ४ व एकूण थांबे ४.
२) ७ सेंटीमीटर.
३) २१ वा दिवस
४) तीन लीटर
५) १४३ धावा प्रती सामना

मराठीतील सर्व लोकप्रभा ( Lokprabha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Puzzle

Next Story
ट्रॅव्हलॉग : बर्फानुभव
फोटो गॅलरी