१. चार संख्यांची सरासरी १६ आहे. शेवटच्या तीन संख्यांच्या बेरजेची निमपट २३ असेल तर पहिली संख्या कोणती?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२. पहिल्या सात महिन्यांत एका गाडीस सरासरी दरमहा ११० लीटर पेट्रोल लागते तर त्यानंतरच्या पाच महिन्यात हीच सरासरी ८६ लीटरवर येते. तर गाडी वर्षभरात दरमहा सरासरी किती लीटर पेट्रोल वापरते?

राजूच्या आजच्या वयात त्याच्या वडिलांचे वय मिळवले असता बेरीज ३० वर्षे होते. राजीवचा जन्म त्याच्या वडिलांच्या २५ व्या वर्षी झाला असेल तर राजीवचे आताचे वय किती?

उत्तरे- स्पष्टीकरणे :
१. उत्तर – १८; स्पष्टीकरण – चार संख्यांची सरासरी १६ म्हणजेच त्यांची बेरीज ६४. शेवटच्या तीन अंकांच्या बेरजेची निमपट २३ म्हणजेच ती बेरीज ४६ आहे. पहिली संख्या म्हणजेच ६४-४६ बरोबर १८.

२. उत्तर – १०० लीटर; स्पष्टीकरण – सात महिन्यांची सरासरी प्रति महिना ११० लीटर., म्हणजेच सात महिन्यात वापरलेले पेट्रोल ७७० लीटर. पुढील पाच महिन्यांत वापरलेले पेट्रोल ८६x५ = ४३०. म्हणजेच १२ महिन्यांमध्ये वापरलेले एकूण पेट्रोल ७७० अधिक ४३० बरोबर १२०० लीटर. म्हणजेच सरासरी प्रती महिना १०० लीटर पेट्रोल.

३. उत्तर – २.५ वर्षे; स्पष्टीकरण – राजूचे आजचे वय क्ष मानू. त्याच्या वडिलांचे वय ३०-क्ष. राजूचा जन्म त्याच्या वडिलांच्या वयाच्या २५ व्या वर्षी. म्हणजेच सध्या दोघांच्याही वयाचा एकूण बेरजेतील वाटा ५ वर्षे. म्हणून राजूचे वय अडीच वर्षे व त्याच्या वडिलांचे वय २७.५ वर्षे.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Puzzle