विज्ञानकथा, दिवाळी २०१३
भयंकर भ्यायलो. मिट्ट काळोखातून कोणी तरी मला न्याहाळत होते. झडझडलो. वस्तुत: घाबरण्याचे मुळीच कारण नव्हते. इथे माझ्याशिवाय कोणीच येऊ शकत नव्हते. मनुष्याचे सोडा. पाल, चिलटेदेखील आत शिरू शकणार नाहीत, एवढी चकडबंद खोली आहे ही. माझ्या संपत्तीची गोळाबेरीज केली तरी, चोरी करावी एवढासुद्धा ऐवज माझ्यापाशी नाही आणि या खोलीत तर काहीच नव्हते. एकही वस्तू नाही. डय़ुप्लिकेट किल्ली करून घेऊन, अगदी कुलूप उघडून कोणी यावे आणि आत माझी वाट पाहात बसून मला घाबरवावे, असे माझे वयही राहिले नाही आणि इतकी घसटही कोणाशी नाही, माझी.
उर्वरित लेख वाचण्यासाठी आजच खरेदी करा लोकप्रभा दिवाळी अंक २०१३