फारुक नाईकवाडे – response.lokprabha@expressindia.com
पूर्वी दहावी/बारावीनंतर पुढे काय, यावर डॉक्टर किंवा इंजिनीअर असेच उत्तर मिळत असे. स्पर्धा परीक्षांविषयीची माहिती, महत्त्वाकांक्षा फौजदार किंवा मामलेदारच्या पुढे जात नसे. मात्र, आता याबाबत महाराष्ट्रात समाधानकारक जागरूकता निर्माण झाली आहे.
स्पर्धा परीक्षांकडे वळण्यामागे फक्त शासकीय नोकरी, सरकारी बंगला, गाडी, सामाजिक प्रतिष्ठा नुसते ही आकर्षणे असून चालणार नाही. आपल्याला नेमके काय साध्य करायचे आहे याबाबत स्पष्टता असणे फार आवश्यक आहे. कारण आजही असे अनेक उमेदवार भेटतात ज्यांना आयएएस, आयपीएस व्हायचे असते. त्यासाठी प्रयत्नसुद्धा सुरू असतात; पण इतर स्पर्धा परीक्षांच्या उदा. एसएससी, सीडीएस, एनडीए किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांबाबत पूर्ण निरुत्साह असतो. शिवाय, बऱ्याच वेळा या परीक्षांबाबत नीटशी
स्पर्धा परीक्षामध्ये करिअर करत असताना तयारी नागरी सेवा परीक्षेपासून करावी. नागरी सेवा परीक्षेची तयारी केल्यामुळे इतर स्पर्धा परीक्षा देणे उमेदवारांना सोपे जाते. नागरी सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम हा विस्तृत स्वरूपाचा आहे. म्हणून ही ‘मदर ऑफ एक्झाम्स’ मानली जाते. या परीक्षेच्या तयारीमुळे इतर विविध परीक्षांना सामोरे जाणे सहज शक्य होते; पण त्यासाठी केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या इतर आणि विविध परीक्षांची माहिती असणे आवश्यक असते. म्हणून केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) व महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध परीक्षांची माहिती या लेखात पाहू.
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)
भारतीय संविधानाच्या कलम ३१५ अन्वये केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. केंद्र पातळीवर यूपीएससी आणि राज्य पातळीवर संबंधित राज्यांच्या लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. यूपीएससीद्वारे दर वर्षी नागरी सेवा, सीडीएस, एनडीए, इंजिनीअरिंग अशा विविध स्पर्धात्मक परीक्षा घेतल्या जातात. या सर्व परीक्षांचे स्वरूप, अभ्यासक्रम पूर्णत: भिन्न असूनही त्या ‘यूपीएससीची परीक्षा’ याच नावाने ओळखल्या जातात. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांविषयी माहिती घेऊ.
यू.पी.एस.सी. (केंद्रीय लोकसेवा आयोग) द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा. :
नागरी सेवा परीक्षा
(सिव्हिल सव्र्हिसेस एक्झ्ॉमिनेशन)
भारतीय वनसेवा परीक्षा
(इंडियन फॉरेस्ट सव्र्हिसेस एक्झ्ॉमिनेशन)
अभियांत्रिकी सेवा परीक्षा
(इंजिनीयरिंग सव्र्हिसेस एक्झ्ॉमिनेशन)
संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा
(कम्बाइन्ड मेडिकल सव्र्हिसेस एक्झ्ॉमिनेशन)
विशेष वर्ग रेल्वे अॅपरेंटिस
(स्पेशल क्लास रेल्वे अॅप्रेंटिस)
भारतीय आíथक सेवा परीक्षा/भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा
(इंडियन इकॉनॉमिक सव्र्हिस एक्झ्ॉमिनेशन/ इंडियन स्टॅटिस्टिकल सव्र्हिस एक्झ्ॉमिनेशन)
संयुक्त भौगोलिक शास्त्रज्ञ आणि भूवैज्ञानिक परीक्षा
(कम्बाइन्ड जिओ सायंटिस्ट अॅण्ड जिओलॉजिकल एक्झ्ॉमिनेशन)
केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) (सेंट्रल आम्र्ड पोलीस फोर्सेस – असिस्टंट कमांडंट एक्झ्ॉमिनेशन )
संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा
(कम्बाइन्ड डिफेन्स सव्र्हिसेस एक्झ्ॉमिनेशन)
राष्ट्रीय संरक्षण अकादमी परीक्षा
(नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी एक्झ्ॉमिनेशन)
नाविक अकादमी परीक्षा
(नेव्हल अॅकॅडमी एक्झ्ॉमिनेशन)
विभागीय अधिकारी/लघुलेखक
(वर्ग-ब/वर्ग-ख) विभागीय स्पर्धा परीक्षा.
(सेक्शन ऑफिसर्स/ स्टेनोग्राफर
(ग्रेड बी/ग्रेड आय) डिपार्टमेंटल कॉम्पिटिटिव्ह एक्झ्ॉमिनेशन)
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी)
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी राज्याच्या प्रशासकीय सेवांसाठी अधिकारी निवडीची परीक्षा घेतो. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अन्वये राज्य लोकसेवा आयोग निर्माण केला असून घटनेच्या कलम ३२० अन्वये सेवक भरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे कार्य आयोग पार पाडतो. आयोगामार्फत विविध सेवांसाठी परीक्षा घेतल्या जातात. या सर्व स्पर्धा परीक्षा ‘एमपीएससी/ एमपीएससीची परीक्षा’ याच नावाने ओळखल्या जातात. आयोगाद्वारे विविध सेवांकरिता घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा खालीलप्रमाणे –
राज्यसेवा परीक्षा
(स्टेट सव्र्हिस एक्झामिनेशन)
महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
(महाराष्ट्र अॅग्रीकल्चर सव्र्हिस एक्झामिनेशन)
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा (महाराष्ट्र इंजिनीअरिंग सव्र्हिस जीआर-ए एक्झामिनेशन)
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा (महाराष्ट्र इंजिनीअरिंग सव्र्हिस जीआर-बी एक्झामिनेशन)
दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा (सिव्हिल जज ज्यु-डिविजन ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास कॉम्पिटिटीव एक्झाम)
सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा (असिस्टंट मोटार व्हेईकल इन्स्पेक्टर एक्झामिनेशन)
सहायक अभियंता (विद्युत) श्रेणी-२, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गट-ब (असिस्टंट इंजिनीअरिंग इलेक्ट्रिकल गार्ड-२, महा. इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग सव्र्हिस बी)
पोलीस उपनिरीक्षक परीक्षा (पोलीस सबइन्स्पेक्टर एक्झामिनेशन)
राज्य कर निरीक्षक (स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर कॉम्पिटेटिव एक्झाम)
सहायक कक्ष अधिकारी (असिस्टंट डेस्क ऑफिसर)
लिपिक-टंकलेखक परीक्षा गट – क
(क्लर्क टायपिस्ट एक्झामिनेशन)
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,
गट – क (स्टेट एक्ससाईज डय़ुटी)
कर सहायक गट – क (टॅक्स असिस्टंट)
केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांची माहिती आपण पाहिली यातील महत्त्वाच्या दोन परीक्षांविषयी सविस्तर माहिती पाहू.
नागरी सेवा परीक्षा (सिव्हिल सव्र्हिसेस एक्झामिनेशन)
राज्यसेवा परीक्षा (स्टेट सव्र्हिसेस एक्झामिनेशन)
नागरी सेवा परीक्षा स्वरूप आणि माहिती
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा यूपीएससीची परीक्षा म्हणूनच ओळखल्या जातात. यापकी आयएएस, आयपीएस, आयएफएस अधिकारी निवडीची परीक्षा ही नागरी सेवा परीक्षा आहे. नागरी सेवा परीक्षेला यूपीएससीची परीक्षा, आयएएसची परीक्षा असेही संबोधले जाते. ही परीक्षा पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतली जाते.
नागरी सेवा (पूर्व) परीक्षा (वस्तुनिष्ठ स्वरूपाची), यातून मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची निवड केली जाते.
नागरी सेवा (मुख्य) परीक्षा (लेखी व मुलाखत) यातून विविध सेवा आणि पदांसाठी उमेदवार निवडले जातात.
पूर्वपरीक्षा (प्रिलिमिनरी एक्झामिनेशन)
पूर्वपरीक्षेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे दोन पेपर असतात. सामान्य अध्ययन पेपर एकचे गुण निर्णायक ठरणार असून मुख्य परीक्षेसाठी निवड या २०० गुणांवरून ठरेल. सामान्य अध्ययन पेपर-दोन हा पात्रता स्वरूपाचा असून, ३३ टक्के म्हणजे ६६ गुण पास होण्यासाठी आवश्यक आहेत. ही परीक्षा खरे तर छाननी करणारी चाचणी आहे. पूर्वपरीक्षेस निगेटिव्ह माìकग सिस्टीम लागू आहे. चुकीच्या प्रतिउत्तरादाखल मिळालेल्या गुणांमधून ०.३३ किंवा ३३ टक्के इतके गुण वजा होतात. पूर्वपरीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या आधारे मुख्य परीक्षेस बसण्यास पात्र उमेदवार निवडले जात असले, तरी अंतिम गुणवत्ता निश्चित करताना हे गुण जमेस धरले जात नाहीत. मुख्य परीक्षेला बसण्यास पात्र उमेदवारांची संख्या ही त्या वर्षांत भरावयाच्या पदांच्या संख्येच्या १२ ते १३ पटीत असते.
पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम:
(१) पेपर १ : सामान्य अध्ययन
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या चालू घडामोडी.
भारतीय इतिहास व राष्ट्रीय चळवळ
भारताचा व जगाचा भौतिक, सामाजिक व आíथक भूगोल
भारतीय राज्य व्यवस्था व शासन
आर्थिक व सामाजिक विकास
पर्यावरणीय परिस्थिती व सामान्य विज्ञान
(२) पेपर २ – नागरी सेवा कल चाचणी (CSAT)
आकलन आणि इंग्रजी भाषा आकलन क्षमता
व्यवस्थापकीय अभिवृत्ती परीक्षण
तार्किक क्षमता व विश्लेषण क्षमता
सामान्य बौद्धिक क्षमता
पायाभूत अंकगणित
माहितीचे अर्थातरण
मुख्य परीक्षा (मेन्स एक्झामिनेशन)
मुख्य परीक्षेचीही दोन भागांत विभागणी केली गेली आहे –
लेखी परीक्षा – १७५० गुण
व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी प्रत्यक्ष मुलाखत – २७५ गुण
लेखी परीक्षेत परंपरागत (डिस्क्रिप्टिव्ह) पद्धतीच्या नऊ प्रश्नपत्रिका आहेत. ही परीक्षा विस्तृत, दीर्घ स्वरूपाची व वर्णनात्मक पद्धतीची असते, लेखी परीक्षेच्या नऊ पेपर्सचे स्वरूप पुढीलप्रमाणे-
पेपर १ : भारतीय भाषा प्रश्नपत्रिका – संविधानाच्या आठव्या परिशिष्टात नमूद भाषांमधून उमेदवाराने निवड केलेल्या भाषेची प्रश्नपत्रिका. इथे मराठी भाषा पेपर आपण निवडू शकतो. या पेपरसाठी ३०० गुण आहेत.
पेपर २ इंग्रजी भाषा – हा पेपर ३०० गुणांसाठी असतो.
हे दोन पेपर पात्रतेच्या स्वरूपाचे असून या पेपर्सचे गुण मुख्य परीक्षेच्या एकूण गुणसंख्येत समाविष्ट करण्यात येत नाहीत. हे दोन्ही पेपर एस.एस.सी. स्तरीय असून, उमेदवाराची भाषिक क्षमता तपासणे, हा त्यांचा हेतू आहे. या दोन्ही विषयांत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अन्यथा इतर पेपर तपासले जात नाहीत व उमेदवार परीक्षेतून बाद ठरतो. या दोन्ही पेपरमध्ये पास होण्यासाठी किमान २५ टक्के गुण मिळवणे आवश्यक असतात. यापुढच्या सात पेपर्सचे गुण व मुलाखतीचे गुण अंतिम निकालासाठी एकत्रितपणे विचारात घेतले जातात.
हे सात पेपर पुढीलप्रमाणे :
सर्व पेपर्स वर्णनात्मक (डिस्क्रिप्टिव्ह) पद्धतीचे असतात व प्रत्येक पेपरसाठी तीन तासांचा कालावधी देण्यात येतो.
नागरी सेवांच्या दृष्टीने महत्त्वाच्या, समर्पक मुद्दय़ांबाबत उमेदवार किती सजग आहे, हे मुख्य परीक्षेच्या माध्यमातून पाहिले जाते. या प्रश्नांमधून उमेदवारांचे महत्त्वाच्या सामाजिक, आíथक मुद्दय़ांबाबतचे मूलभूत आकलन आणि त्यांची याबाबतची विश्लेषण क्षमता आयोग तपासतो.
उमेदवारांनी थोडक्यात, समर्पक व अर्थपूर्ण उत्तरे लिहिणे अपेक्षित असते.
मुख्य परीक्षेसाठी वैकल्पिक विषय
वैकल्पिक विषय (पेपर ६ व पेपर ७) याचा अभ्यासक्रम (डब्ल्यू ऑनर्स) पदवीच्या दर्जाचा असतो. म्हणजेच पदवीपेक्षा जास्त आणि पदव्युत्तरपेक्षा कमी. अभियांत्रिकी, मेडिकल आणि लॉच्या अभ्यासक्रमाचा दर्जा हा त्यातील पदवीइतका असतो. वैकल्पिक विषयांची सूची पाहाण्यासाठी http://www.upsc.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.
व्यक्तिमत्त्व चाचणी/मुलाखत (इंटरव्ह्य़ू)
मुलाखत ही एक व्यक्तिमत्त्व चाचणी आहे. २७५ गुणांसाठीची ही चाचणी घेतली जाते. अंतिम निवड यादीमधले तुमचे नेमके स्थान ठरविण्यासाठी मुलाखत महत्त्वाची ठरते.
सक्षम तसेच निष्पक्ष निरीक्षकांचा समावेश असलेल्या मुलाखत मंडळाकडून उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व नागरी सेवा क्षेत्रामध्ये कार्य करण्यायोग्य आहे की नाही, हे मुलाखतीतून पाहिले जाते. उमेदवारांचा बौद्धिक कस व सर्वसाधारण महत्त्वाच्या मुद्दय़ांबाबतची सजगता येथे पाहिली जाते. मुख्य परीक्षेचे गुण आणि मुलाखतीचे गुण यातून अंतिम यादी तयार होते.
राज्यसेवा परीक्षा स्वरूप आणि माहिती
(स्टेट सव्र्हिस एक्झामिनेशन)
ही परीक्षा एकूण तीन टप्प्यांत घेण्यात येते १) पूर्वपरीक्षा – ४०० गुण २) मुख्य परीक्षा – ८०० गुण ३) मुलाखत- १०० गुण. पूर्वपरीक्षेचे स्वरुप चाळणी परीक्षेचे असून त्यात आयोगाने निश्चित केलेल्या किमान सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारा उमेदवार पूर्वपरीक्षेत पास होऊन मुख्य परीक्षेसाठी निवडला जातो. पूर्वपरीक्षेचे गुण अंतिम निकालात मोजत नाहीत.
अभ्यासक्रम
(१) पेपर १ – सामान्य अध्ययन
राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयदृष्टय़ा महत्त्व असणाऱ्या चालू घडामोडी.
महाराष्ट्रासह विशेष संदर्भासह भारताचा इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ.
महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल- प्राकृतिक, सामाजिक व आíथक भूगोल.
महाराष्ट्र व भारत – राज्यशास्त्र व शासनव्यवस्था, राज्यघटना, राजकीय प्रणाली, पंचायती राज, शहरी शासन व्यवस्था, सार्वजनिक धोरणा, हक्क इ.
आíथक व सामाजिक विकास- शाश्वत विकास, दारिद्रय़, समावेशन, लोकसंख्या शास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपाययोजना.
पर्यावरणीय परिस्थिती की, जैवविविधता व हवामान बदल (विषयाचे विशेष ज्ञान आवश्यक नाही)
सामान्य विज्ञान
(२) पेपर २ – नागरी सेवा कल चाचणी (CSAT)
आकलन कौशल्य (कॉम्प्रेहेन्शन)
आंतरवैयक्तिक आणि संभाषण कौशल्य (इन्ट्रापर्सनल स्किल इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल)
ताíकक विचार व विश्लेषणात्मक क्षमता (लॉजिकल रिजनिंग अॅण्ड अॅनालिटिकल अॅबिलिटी)
निर्णय प्रक्रिया व समस्यांची सोडवणूक (डिसिजन मेकिंग अॅण्ड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग)
सामान्य बुद्धिमता चाचणी (जनरल मेंटल अॅबिलिटी)
मूलभूत अंकगणितीय कौशल्य व सामग्री विश्लेषण (बेसिक न्यूमेरेसी अॅण्ड डेटा इंटरप्रेटेशन)
इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य (इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रेहेन्शन स्किल)
मुख्य परीक्षा (मेन एक्झामिनेशन)
परीक्षेचे टप्पे-दोन-लेखी परीक्षा-८०० गुण व मुलाखत १०० गुण
प्रश्नपत्रिका – ६ अनिवार्य
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप: प्रस्तुत लेखी परीक्षेमध्ये खाली नमूद केल्याप्रमाणे सहा अनिवार्य प्रश्नपत्रिका असतात.
मुलाखत (इंटरव्ह्य़ू)
मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोगाच्या कार्यक्रमानुसार तसेच आयोगाने निश्चित केलेल्या ठिकाणी व वेळेस घेण्यात येतात. मुलाखत १०० गुणांची असते.
अंतिम निकाल:
मुख्य परीक्षा आणि मुलाखतीमध्ये प्राप्त केलेल्या गुणांची एकत्रित बेरीज करून गुणवत्ताक्रमानुसार अंतिम यादी तयार करण्यात येते.
नागरी सेवा परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी राष्ट्रचेतना प्रकाशनाचे ‘आयएएस मंत्रा- नागरी सेवा परीक्षा माहिती कोश’ हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
एमपीएससीच्या परीक्षेसाठी ‘सिव्हिल्स महाराष्ट्र – राज्यसेवा परीक्षा माहिती कोश’ हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
