डोकं लढवा

१. एक संख्या ३१ पेक्षा जितक्या संख्येने मोठी आहे, तितकीच ५५ पेक्षा लहान आहे. तर ती संख्या कोणती?

१. एक संख्या ३१ पेक्षा जितक्या संख्येने मोठी आहे, तितकीच ५५ पेक्षा लहान आहे. तर ती संख्या कोणती?
२. एका माणसाने प्रत्येकी ४५० रुपयाने ५ शर्ट खरेदी केले, प्रत्येकी ७५० रुपयाने ४ पँट खरेदी केल्या आणि प्रत्येकी ७५० रुपयांचे बुटांचे १२ जोड खरेदी केले तर प्रत्येक वस्तूवरील सरासरी खर्च किती?
३. दोन संख्यांमधील फरक २४ असून दोन्ही संख्या पूर्ण वर्ग असतील तर त्या संख्या कोणत्या?
४. दहा जणांची सरासरी उंची १०५ सेंटिमीटर आहे. जर त्यात १२० सेंटिमीटर सरासरी उंची असलेले एकूण २० विद्यार्थी मिळवले तर त्यांची सरासरी किती होईल?
५. एका गावात २५०० महिला आहेत. त्यातील अवघ्या पाच टक्के महिला पदवीधर आहेत आणि २० टक्के महिला शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. १० टक्के महिलांना लिहिता-वाचता येत असेल तर गावातील साक्षर महिलांची संख्या किती?

गणितांची स्पष्टीकरणे :
१. ३१ आणि ५५ या दोन संख्यांमधील फरक २४. या फरकाच्या निम्मे म्हणजे १२ ही संख्या ३१ मध्ये मिळवली आणि ५५ मधून वजा केली तर येणारे उत्तर ४३.
२. पाच शर्टाचे एकूण मूल्य २२५० रुपये, चार पँटस्चे एकूण मूल्य ३००० रुपये. १२ जोडांचे ९००० रुपये. म्हणजेच एकूण २१ वस्तूंचे १४२५० रुपये. म्हणजेच प्रत्येक वस्तूसाठी सरासरी ६७८ रुपये व ५० पैसे.
३. दोन क्रमागत संख्यांच्या पूर्णवर्गामध्ये क्रमागत विषम संख्येचा फरक असतो. उदा. १ चा वर्ग १, २ चा वर्ग ४, ३ चा वर्ग ९, ४ चा वर्ग १६ (या सर्व वर्गाधील फरक अनुक्रमे ३,५,७.. असा येत जातो.) याच क्रमाने सदर गणित सोडवता येईल. (उत्तर २५ आणि ४९)
४. दहा जणांची सरासरी १०५ म्हणजेच एकूण उंची १०५० सेंटिमीटर. २० जणांची सरासरी १२० सेंटिमीटर. म्हणजेच एकूण उंची २४००. एकूण ३० जणांची एकूण उंची ३४५०. म्हणजेच सरासरी ११५ सेंटिमीटर.
५. लिहिता-वाचता येणाऱ्या, शालांत परीक्षा उत्तीर्ण आणि पदवीधर महिलांची एकूण टक्केवारी ३५ टक्के. एकूम महिलांची संख्या २५००. म्हणजेच, साक्षर महिला २५०० च्या ३५ टक्के, म्हणजेच गावातील साक्षर महिलांची संख्या ८७५.

मराठीतील सर्व लोकप्रभा ( Lokprabha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Word puzzle

Next Story
टीव्ही : ‘एअरलाइन्स’चा मराठी पायलट!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी