डोकं लढवा

१. एका सभागृहातील मिलिंद, राहुल, ज्योतिरादित्य, वरुण आणि राज्यवर्धन यांची हजेरी तपासली असता ती अनुक्रमे २१५, २३०, २४०, २०० आणि २४५ अशी भरली. तर या सर्वाची सरासरी हजेरी किती?

१. एका सभागृहातील मिलिंद, राहुल, ज्योतिरादित्य, वरुण आणि राज्यवर्धन यांची हजेरी तपासली असता ती अनुक्रमे २१५, २३०, २४०, २०० आणि २४५ अशी भरली. तर या सर्वाची सरासरी हजेरी किती?

२. भाग्यश्री आणि भार्गवी या मैत्रिणी. भार्गवी मोठी तर भाग्यश्री लहान. दोघींच्या आजच्या वयाची बेरीज ३५ आहे. पाच वर्षांनी भाग्यश्रीचे वय भार्गवीच्या वयाच्या चार पंचमांश (४/५) होईल तर आजची दोघींची वये किती?

३. अजिंक्यने पाच डावांत अनुक्रमे १०, २०, ९०, १३४ नाबाद आणि ८२ नाबाद अशा धावा काढल्या. तर त्याची पाच डावांमधील सरासरी किती?

४. एका घनाचे पृष्ठफळ १५० चौरस सेमी आहे. तर त्याचे घनफळ किती?

५. एक ट्रेन ताशी ८० किलोमीटर वेगाने धावत असेल तर एकदाही न थांबता १२ मिनिटांत ती किती अंतर पार करेल?

उत्तरे स्पष्टीकरणासहित :

१. उत्तर : २२६ दिवस; स्पष्टीकरण : सरासरी = एकूण दिवस भागिले एकूण सदस्य. इथे एकूण दिवस होतात ११३० तर सदस्य पाच. म्हणून ११३० ला ५ ने भागले असता उत्तर २२६ येईल.

२. उत्तर : १५ आणि २० वर्षे; स्पष्टीकरण : आजच्या वयांची बेरीज ३५ आहे, पाच वर्षांनी ही बेरीज ४५ होईल. ४५ ची अशी फोड करायची की ज्यात एक संख्या दुसऱ्या संख्येच्या ४/५ असेल. म्हणजेच ४/५क्ष + क्ष = ४५ हे समीकरण सोडविले असता उत्तर २० आणि २५ वर्षे असे येईल. पण ही पाच वर्षांनंतरची वये आहेत. त्यामुळे सध्याची वये १५ आणि २० वर्षे.

३. उत्तर : ११२ धावा; स्पष्टीकरण : क्रिकेटमध्ये सरासरी मोजताना फक्त फलंदाज किती वेळा बाद झाला ते मोजले जाते. त्यामुळे अजिंक्यने काढलेल्या एकूण धावा ३३६ व तो तीन वेळा बाद झाला. म्हणजेच ३३६ भागिले ३. म्हणून उत्तर ११२ धावा.

४. उत्तर : १२५ घनसेंटीमीटर; स्पष्टीकरण : घनाचे पृष्ठफळ = ६ x (बाजू वर्ग). इथे पृष्ठफळ १५० म्हटले आहे. याचा अर्थ बाजू वर्ग येतो २५ म्हणजेच बाजूची लांबी येते ५ सेंटीमीटर. घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन म्हणजेच ५ चा घन म्हणून १२५ घनसेंटीमीटर.

उत्तर : १६ किलोमीटर; स्पष्टीकरण : १२ मिनिटे म्हणजे एक तासाचा पाचवा भाग. ट्रेनचा वेग ताशी ८० किलोमीटर असेल तर तासाच्या पाचव्या भागात ट्रेन ८० च्या एक पंचमांश म्हणजेच १६ किलोमीटर अंतर पार करेल.

मराठीतील सर्व लोकप्रभा ( Lokprabha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Word puzzle

Next Story
वाचक प्रतिसाद : जातपंचायतीच्या उचापत्या कोण बंद करणार?
फोटो गॅलरी