पण आत्ताच्या काळात सगळे बदलले आहे. कोण कुणाला असे पत्र, चिठ्ठी लिहिली की सगळे त्यालाच हसतात. चिडवतात. किती जुनाट विचारांची आहेस असं म्हणतात. आता सगळे जग ‘व्हॉटस्अॅप’वर चालते. आठवण आली, काही वाटले तर लगेच ‘अपडेट व्हायचं’ सगळय़ांसोबत गप्पा मारायच्या. आपल्या फीलिंग त्या फायलीतून दाखवायच्या. आपला प्रोफाइल पिक्चर स्टेट्स रोज बदलायचा. आपण ज्या काही गप्पा मारतो त्या थोडय़ा वेळाने डिलिट होऊन जातात. आपण कुणाला तर काहीतरी आपल्या भावना सांगतो ते तेवढय़ापुरते लक्षात राहते, नंतर त्यांना काही अर्थच उरत नाही. शुभेच्छा सगळय़ा त्या दिवसापुरत्या आठवतात, नंतर त्यासुद्धा पुसल्या जातात. त्या आपल्यासोबत कायम राहत नाहीत. त्या निघून जातात. फक्त काही तासांपुरतेच आपल्यासोबत असतात. काही वाटले तर तेवढय़ापुरते? यायचे-बोलायचे संपले! माणूस कळत नकळत आपला स्वार्थ बघत चालला आहे. त्याचा आनंद छोटा झाला आहे व आनंदसुद्धा काही तासांपुरता असतो. पण त्यातल्या गप्पा मात्र वेळखाऊ असतात. चिठ्ठीतील मजा त्यात नाही. आपली कल्पनाशक्ती मरते. आपला आनंद छोटा होतो, पण चिठ्ठीतून आनंद आपल्यासोबत राहतो. आठवणी सोबत राहतात. चिठ्ठीतून आपल्या भावना मनाला जाऊन भिडतात. तसे व्हॉटस्अॅपवर होत नाही. बघा तुम्हीच विचार करून…
तन्मयी उमेश कुलकर्णी
संग्रहित लेख, दिनांक 6th Mar 2015 रोजी प्रकाशित
युथफुल ब्लॉगर : चिठ्ठी ते व्हॉटस्अॅप…
आज सहज खिडकीत बसून बाहेरचे दृश्य बघत होते. तेव्हा मनात विचार आले की, अरे हे जग किती बदलले आहे! इथली सगळी माणसे मोबाइलमय झाली आहेत. या जगातील लोकसंख्येपेक्षा मोबाइलची संख्या जास्त...

First published on: 06-03-2015 at 01:11 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youthfull blogger