दही.. एक जगणे

सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉटस् अपवर स्वार होऊन रोज नवनवे दृष्टान्त, दाखले, उतारे आपल्यावर येऊन आदळतात. मी कधी ते वाचतो, कधी टाळतो.

सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉटस् अपवर स्वार होऊन रोज नवनवे दृष्टान्त, दाखले, उतारे आपल्यावर येऊन आदळतात. मी कधी ते वाचतो, कधी टाळतो. कारण त्याच कल्पना आपल्या लेखणीतून उतरल्या तर वाङ्मयचौर्याचा आळ. बरं, ‘कव्हर क्रेडिटस्’ द्यायचे ठरविले तरी अनेकदा नेमक्या लेखकाचा पत्ता नसतो आणि आपल्यापर्यंत पोहचेपर्यंत त्या लेखांकाला इतक्या ठिकाणहून फोडणी मिळालेली असते की विचारूच नका. पण या साऱ्या पाश्र्वभूमीवर नाशिकच्या माझ्या सर्जन मित्राने – गोिवदने ‘दह्या’वरचा दाखला टाकला आणि माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले.
दही.. म्हटलं तर एक दुग्धजन्य पदार्थ. ज्याच्याकडे नुसतं पाहिलं तरी शांत वाटावा असा पदार्थ. स्वयंपाकातल्या प्रत्येक पदार्थाला स्वत:चे असे एक व्यक्तिमत्त्व असते. चटणी ही कोिशबिरीसारखी सगळ्यांशी मिळून-मिसळून वागत नाही. आपले वेगळेपण राखते. म्हणून तर तिला ताटात एक कोपरा लाभतो. कोिशबीर पसरते. भेंडी, बटाटा, फरसबी अंग आखडून वागतात. वांगी, फ्लॉवर, टॉमेटो मात्र सार्वभौम साम्राज्यासारख्या ताटाच्या कडांना आपलंसं करतात. दह्याचे तसे नाही. ते वाटीत जराही इस्त्रीची घडी न मोडता बस्तान बसविते. थोडेसे अधमुरे असले तर थलथलते. पण पिठल्याच्या थलथलण्यापेक्षा आपले वेगळेपण राखते. शाळेपासून आजपर्यंत एक वाटी दही आणि पोळी/भाकरी यावर मी सहज ‘छ४ल्लूँील्ल’ संपवू शकतो. बरं, किती प्रकारे ते आपल्याला भेटते! मटण-चिकनला ‘मॅरिनेट’ करण्यासाठी ते स्वत:ला तुकडय़ांना िलपून घेते. भाजलेल्या गॅस/शेगडीवरच्या वांग्याच्या अंतस्थ चटक्यांना मिश्रणातून ते थंडावा देते. आटवले की कढी, घुसळले की ताक. ताकाचा भुरका मारताना आम्हाला शाळेतला नववीचा ‘तक्रं शक्रस्य दुर्लभम’.. इंद्रालाही अप्रूप.. हा श्लोक आठवतो. दही पंचामृताचा भाग होते आणि नवेद्याची चव खुलवते. कधी पिवळे पडते आणि आंबट होते. मग घरात शेंगदाणे घालून ताकातली पालकाची भाजी होते आणि सर्व पंचतारांकित एटिकेट बाजूला सारून आम्ही वाटी तोंडाला लावते होतो. दही काकडी-टॉमेटोच्या कापांना खुलवते आणि सॅलड म्हणून सव्‍‌र्ह होते. उत्तम चहा करण्यासारखेच उत्तम दही लावण्याचे एक शास्त्र असते. दुधाचे विशिष्ट तापमान, विरजण दह्य़ाचा नेमका अंश आणि चमचा फिरविण्याची नेमकी दिशा महत्त्वाची. फ्रीजमध्ये ठेवायचे की बाहेर, याचाही अंदाजे बयाँ करणे श्रेयस्कर. इंद्रापासून श्रीकृष्णापर्यंत सर्वाना प्रिय असलेले हे दही.. जात, धर्म, प्रांत, देश, खंडांच्या सीमा ओलांडते. ‘योगर्ट’च्या रूपात त्याला नवे स्वाद लाभतात. पण इंग्लंडमध्ये ते सुपर मार्केटमधून आणून मटकावताना आम्हाला आमच्या आईने हातावर घातलेले दहीच आठवते.
या सर्व दुग्धजन्य पदार्थाचा स्वत:चा एक स्वभाव आहे. दूध नितळ किंवा तापट, पण मूलत: नीरसे. तूप स्नेहाळ. ताक प्रवाही. खवा खुसखुशीत. चक्का गोठलेला. पण दही मात्र रसरशीत, नेत्रसुखदायक, जिव्हाग्नीशामक शांत, स्तब्ध. एखाद्या तरंग न उठणाऱ्या डोहासारखे. दही आपल्याला खूप काही शिकवते. जीवन आणि करिअर घडवावं लागतं. त्यासाठी थोडी वाट पाहावी लागते. नुसतंच दूध भांडय़ात ठेवून ते जमत नाही, तर ते जमण्यासाठी सबुरी लागते. दह्य़ात प्रचंड flexibility आहे. आयुष्यात लवचीक राहाल तर कुठेही जमून जाल आणि जेथे जमाल त्याचे सौंदर्य, रुची वाढवाल. बरं, एखाद्या पदार्थात जमल्यावर ते स्वत:चे वेगळे अस्तित्व दाखविण्याचा अट्टहास कधीच करत नाही. दही हे या अर्थाने आयुष्याला ‘परफेक्ट टीम मेंबर’ होण्याचा संदेश देते. ते मूलत: शाकाहारी, पण मांसाहाराची लज्जत वाढविते. तेव्हा वेगवेगळ्या घटकांशी जमवून घेताना स्वत:च्या गुणधर्माना न सोडता त्यांचे वैशिष्टय़ खुलविणे म्हणजेच ‘मॅरिनेट’  होणे होय. दही आंबले तरी टाकावे लागत नाही, आयुष्यात मनासारखे झाले नाही तर शिडाची दिशा बदलून नव्या प्रवासाला प्रारंभ करण्यातच प्रारब्ध आहे, हे दही सांगते. घरातले संपले तर शेजारच्या पुराणिक किंवा कांबळेंकडून मागून आणताना आम्हाला कधी संकोच वाटत नाही. खरं तर आठ दिवसांच्या प्रवासाहून आल्यावर घर उघडल्यावर कपभर दूध आणि विरजणाला दही आणून आम्ही आमची संस्कृती जपतो. मागणाऱ्याला कमीपणा नाही आणि देणाऱ्याला श्रेष्ठत्व नाही. ताकातली भाजी ही वाटीतून शेजारच्या घरी पोहोचते, तेव्हा आम्ही चवीचे नाही, तर सौहार्दाचे संकलन करतो. आजही मॉलच्या जमान्यात ‘पॅकबंद दह्याचे विरजण नीट लागत नाही बाबा, शेजारच्या काकूंकडूनच आण!’ हा स्वयंपाकघरातून आलेला आदेश आम्ही पाळतो आणि तेच उत्तम लागते हेही सत्य आहे.
.. भीती वाटते ती आजकाल बंद दरवाजांची.. बेल वाजविल्यावर शेजारची आँटी भडकणार तर नाही, याची. मग मॉलमधून गोवर्धन, अमूल, डॅनाई किंवा चितळे यांपकी कोणता डबा घ्यायचा याचा मला संभ्रम पडतो. ‘‘अरे बाबा, ज्याच्या डब्याला प्लॅस्टिकचे झाकण आहे, नुसता रॅपर नाही ते आण. ती सगळीच सारखी.. त्यांना घरची सर नाही!’’ हे आईचे वाक्य आठवतं. मी ५० रुपयांचा दह्याचा डबा उचलतो आणि नव्या संदर्भात आयुष्य जगायला शिकतो.
..गाडी स्टार्ट करणार, तेवढय़ात सौभाग्यवतींचा व्हॉटस् अप आलेला असतो.. माझे सर्वज्ञात मर्सडिीज-प्रेम जाणून तिने मुद्दाम खिजवायला jpeg image पाठवलेली असते. म्हशीच्या आटोपशीर गोठय़ात पांढरीशुभ्र मर्सडिीज गाडी पार्क केलेली असते अन् तिच्या फ्रंट लेफ्ट व्हीलच्या डिस्कला एक साखळी बांधून त्याला दूध-दही-लोणी-तूप देणारी एक काळीकभिन्न, िशगवाली भंसन बांधलेली असते.. मी हसतो अन् पत्नीला कळविता होतो- चित्रातल्या गाडीचा नंबर बघ..  MH-14.. series आहे. हे फक्त माझ्या लाडक्या पुण्यातच शक्य आहे. आयुष्य हे दह्यासारखेच जमवू या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व जनात…मनात बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Importance of curd in life

Next Story
निकाल लागताना..
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी