जंगलात तीन धोंडे मांडून चकमकीच्या दगडाने ठिणगी पेटवून अन्न शिजवणे हे आता फक्त गड-किल्ले पायी फिरणारी उत्साही मंडळीच करतात, किंवा हातावर पोट आणि पाठीवर बिऱ्हाड असणारे कष्टकरी कामाच्या जागीच चूल पेटवतात. हजारो वर्षांचा इतिहास असलेली अन्न शिजवणे किंवा भाजणे ही प्रक्रिया
विद्युत् चुंबकीय लहर पटलातील १ मी. ते १ मि. मी.च्या पट्टय़ात लहर लांबी असलेल्या लहरी मानवी डोळ्यांना दिसत नाहीत; पण त्यांच्यामुळे विद्युत् ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते. या लहरींच्या उष्णतानिर्मिती गुणधर्माच्या शोधाची कहाणी रंजक आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात शत्रुराष्ट्राच्या विमानांचा वेध घेण्यासाठी अधिक कार्यक्षम रडार यंत्रणा (जी या प्रकारच्या सूक्ष्म लहरी वापरते.) तयार करण्याचे प्रयत्न चालू होते. त्यासाठी अधिक क्षमतेची, सूक्ष्म लहरी निर्माण करणारी यंत्रणा तयार करण्याच्या प्रयत्नांत पर्सी स्पेन्सर या अमेरिकन तंत्रज्ञाला त्याचे यासंबंधीचे
चित्र क्र. १ मध्ये सध्या बाजारात उपलब्ध असलेली सूक्ष्म लहर भट्टी दाखवली आहे, तर चित्र क्र. २ मध्ये या भट्टीची कार्यपद्धती दिसते. सूक्ष्म लहर भट्टीमध्ये ठेवलेले अन्न या भट्टीतील सूक्ष्म लहरींच्या उत्सर्जनामुळे
द्युतभार असतो. (चित्र क्र. ३ )
हे द्विभारित रेणू सूक्ष्म लहरींच्या क्षेत्रात आल्यावर एकाच वेळी विरुद्ध दिशेला खेचले गेल्यामुळे स्वत:भोवती फिरायला लागतात. फिरताना ते आसपासच्या इतर रेणूंवर आदळतात आणि त्यांनाही गतिमान बनवतात. या गतीमुळे ऊर्जा प्रसारित व्हायला लागते आणि ती गतिज ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात मोकळी होते. या उष्णतेमुळेच अन्न गरम होते, शिजते किंवा भाजून कोरडे होते. सूक्ष्म लहर भट्टी चालण्यात महत्त्वाचा वाटा असतो तो या लहरी तयार करणाऱ्या ‘मॅग्नेट्रॉन’ या उपकरणाचा!
या प्रकारच्या शिजण्यामध्ये अन्नातील पाण्याचे प्रमाण हा महत्त्वाचा घटक ठरतो. जेवढे पाणी कमी, तेवढी सूक्ष्म लहर भट्टीची कार्यक्षमता कमी. तसेच या लहरी धातूवरून परावर्तित होत असल्याने या भट्टीत अन्न ठेवताना ते काचेच्या किंवा प्लास्टिकच्या भांडय़ात ठेवतात; जेणेकरून लहरी अन्नामध्ये शोषण्याचे प्रमाण वाढून भट्टीची कार्यक्षमता वाढते. तसेच धातू विद्युतवाहक असल्याने आतील उच्च विभवान्तरातील लहरींमुळे भांडे आणि भट्टीच्या आतील िभती यात ठिणग्या तयार होण्याचा धोका असतो, तो टळतो. (आताशा बाजारात microwave safe अशी ग्वाही देणारी विशिष्ट प्रक्रिया केलेली धातूची भांडीही मिळतात.)
आधुनिक सूक्ष्म लहर भट्टय़ांमध्ये असलेली फिरणारी काचेची थाळी, अन्नाच्या प्रकारानुसार पूर्वनियोजित ठरवलेली आणि नियंत्रित केलेली वेळ यांसारख्या सुविधांमुळे पारंपरिक शिजवण्याच्या पद्धतीपेक्षा या भट्टीत कमी खर्चात आणि कमी वेळेत अन्न शिजू शकते.
संग्रहित लेख, दिनांक 3rd May 2015 रोजी प्रकाशित
मायक्रोवेव्ह ओव्हन (सूक्ष्म लहर भट्टी)
जंगलात तीन धोंडे मांडून चकमकीच्या दगडाने ठिणगी पेटवून अन्न शिजवणे हे आता फक्त गड-किल्ले पायी फिरणारी उत्साही मंडळीच करतात, किंवा हातावर पोट आणि पाठीवर बिऱ्हाड असणारे कष्टकरी कामाच्या जागीच चूल पेटवतात.

First published on: 03-05-2015 at 12:14 IST
मराठीतील सर्व तंत्रजिज्ञासा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Microwave oven