शिकार कथा या नेहमीच वाचकांच्या आवडीच्या असतात. त्याचे कारण त्यातील गूढता, थरारकता, उत्कंठा आणि कथेतील ओघवतेपणा. जिम कॉर्बेट यांनी केलेल्या विविध शिकारकथा वाचणाऱ्यांना जॉन पिटरसन यांनी सिंहांच्या केलेल्या शिकारकथा वाचतानाही तितकाच थरार जाणवेल.

आफ्रिकेमध्ये केनियातील मोंबासा ते युगांडामधील कंपाला या शहारापर्यंत रेल्वेमार्ग उभारण्याचे काम १८९६ ते १९०३ दरम्यान करण्यात येत होते. भारतीय वंशाचे मजूर हे काम करत होते. त्यांच्या वस्त्यांवर तेथील जंगलातील सिंहाचे आक्रमण ही नित्याची गोष्ट झाली होती. त्या सिंहांपैकी दोन सिंह हे नरभक्षक होते आणि त्यांनी सर्वाना सळो की पळो करून सोडले होते. लेफ्टनंट कर्नल जॉन पिटरसन यांना या मार्गावरील त्सावो नदीवर असलेल्या पुलाच्या उभारणीसाठी प्रमुख म्हणून नेमण्यात आले होते. त्यांनी या नरभक्षक सिंहांची शिकार कशा पद्धतीने केली आणि त्यावेळी त्यांच्यावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कसे संकट आले याची ओघवती कहाणी म्हणजे ‘त्सावोचे नरभक्षक’ हे पुस्तक. जॉन पिटरसन यांचे हे पुस्तक शिकारकथा मालिकांमधील पहिले किंवा पहिल्या काही पुस्तकांमधील एक अशी नोंद आहे. या कथांची सत्यकथा नाटय़पूर्ण असून त्यावर अनेक भाषांमध्ये चित्रपट निर्माण झाले आहेत.

‘त्सावोचे नरभक्षक’, मूळ लेखक : ‘जॉन हेन्री पॅटरसन’, अनुवाद : विनय वसंत देशपांडे, ग्रंथाली प्रकाशन. पाने : २५२, किंमत : ३०० रुपये.

बाजारात दाखल : फुले फुलली श्रमाची  डॉ.दीपक आगलावे  ग्रंथाली

ताऱ्यांची जीवनगाथा  डॉ. जयंत नारळीकर   अनु. पुष्पा खरे   राजहंस प्रकाशन

lokrang@expressindia.com