राज्यातील करोना संसर्ग अद्यापही झपाट्याने वाढतच आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहे. शिवाय, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण सध्यातरी काहीसे कमी दिसून येत आहे. आज दिवसभरात राज्यात ६७ हजार १६० नवीन करोनाबाधित आढळून आले. तर, ६७६ रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यू दर १.७६ टक्के एवढा आहे.
दरम्यान आज ६३ हजार ८१८ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ३४,६८,६१० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.०२ टक्के एवढे झाले आहे.
67,160 new #COVID19 cases, 63,818 discharges and 676 deaths were reported in Maharashtra in the last 24 hours
Active cases: 6,94,480
Death toll: 63928
Total cases: 42,28,836
Total recoveries: 34,68,610 pic.twitter.com/8CRVohdcrM— ANI (@ANI) April 24, 2021
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,५४,६०,००८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४२,२८,८३६ (१६.६१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४१,८७,६७५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,२४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.