News Flash
Advertisement

महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी खुले ; मात्र रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट बंधनकारक!

व्यापारी व हॉटेलमधील कामगार यांची दर दहा दिवसांनी करोना तपासणी होणार

महाबळेश्‍वर -पाचगणी ही राज्याची पर्यटनस्थळे अनेक दिवसांच्या टाळेबंदीनंतर पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. मात्र येथे येणाऱ्या पर्यटकांची दांडेघर नाक्यावर रॅपिड अ‍ॅन्टीजेन तपासणी करण्यात येणार असल्याची माहीती वाईच्या प्रांताधिकारी संगिता राजापुरकर -चौगुले यांनी महाबळेश्‍वर येथील हिरडा विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत दिली. या वेळी तहसीलदार सुषमा चौधरी पाटील व माजी नगराध्यक्ष डी.एम बावळेकर उपस्थित होते.

साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी टाळेबंदीच्या नियमात शिथिलता देऊन काही निर्बंध उठविले आहेत. यानुसार शनिवार (दि.१९) सकाळपासून महाबळेश्वर व पांचगणी ही दोन्ही पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत.

दरम्यान, टाळेबंदीच्या नियमात कशा प्रकारे शिथिलता देण्यात आली असल्याची माहिती देण्यासाठी वाईच्या प्रांताधिकारी संगिता राजापुरकर चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली महाबळेश्वर येथील विविध संघटनांचे प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीत प्रांताधिकारी यांनी निर्बंध शिथलते बाबत सविस्तर माहिती दिली. येथे येणाऱ्या पर्यटकांना करोनाची चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. करोना चाचणीचे अहवाल बरोबर घेवून येणाऱ्या पर्यटकांची पांचगणी येथील दांडेघर नाक्यावर रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट घेण्यात येणार आहे. यामध्ये ज्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशाच पर्यटकांना पांचगणी व महाबळेश्वर येथे प्रवेश देण्यात येणार आहे. बाजार पेठेतील दुकानदारांची करोना टेस्ट बंधनकारक आहे. व्यापारी व हॉटेल मधील कामगार यांची दर दहा दिवसांनी करोना तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. करोना बाबतचे सर्व नियम हॉटेल व्यवसायिक व व्यापारी यांना बंधनकारक करण्यात आले आहेत .

या बैठकीला गट विकास अधिकारी नारायण घोलप , पांचगणीचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर , महाबळेश्वर पालिकेच्या कर निरीक्षक भक्ती जाधव हॉटेल संघटनेचे अध्यक्ष मनिष तेजाणी , दिलीप जव्हेरी , असिफ सयद , धिरेन नागपाल , योगेश बावळेकर , रोहन कोमटी , अॅड संजय जंगम , सुर्यकांत जाधव , माजी नगरसेवक संतोष शिंदे , व्यापारी प्रतिनिधी अतुल सलागरे नितीन शिंदे , प्रितम शिंदे , केतन यादव आदी मान्यवर उपस्थित होते

23
READ IN APP
X
X