पुणे-सोलापूर रस्त्यावर टेंभुर्णी येथे आज सायंकाळी एका मोटारीतून नेली जात असलेली १५ कोटी रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. ही रक्कम पंढरपूरमधील विठ्ठल साखर कारखान्याची असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळले असले तरी पोलिसांनी हे प्रकरण पुढील तपासासाठी आयकर विभागाकडे सोपवले आहे.
निवडणूक काळात मतदारांना पैसे वाटण्याच्या घटना सर्वत्र घडतात. यासाठी रोख रकमेची मोठी वाहतूक सध्या केली जाते. यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांकडून सध्या जागोजागी तपासणी नाकी उभारण्यात आलेली आहे. टेंभुर्णी येथे उभारण्यात आलेल्या अशाच एका नाक्यावर आज सायंकाळी एका मोटारीतून १५ कोटी रुपये हस्तगत करण्यात आले. या प्राथमिक चौकशीत ही रक्कम पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल साखर कारखान्याची असल्याचे आढळले आहे. परंतु तरीही ही रक्कम कशासाठी आणली जात होती. ती कुठून आणली याचा तपास उशिरापर्यंत सुरू होता.
संग्रहित लेख, दिनांक 12th Apr 2014 रोजी प्रकाशित
पंधरा कोटींची रक्कम टेंभुर्णीजवळ जप्त
पुणे-सोलापूर रस्त्यावर टेंभुर्णी येथे आज सायंकाळी एका मोटारीतून नेली जात असलेली १५ कोटी रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली.
First published on: 12-04-2014 at 02:03 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 15 cr cash seized near tembhurni