धोम जलाशयात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. आज सकाळी हे तरूण पुण्यातून वाईला आले होते.
कौस्तुभ विजय मढेंकर रा. वाई व अमेय शशांक बांग रा. वसंतविहार ,जैन मंदिर रोड ,शिळफाटा ,खोपोली असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. ही दोन्ही मुले अभियांञीकीचे विद्यार्थी होते. हे दोघेही धोम जलाशयात पोहण्यासाठी गेले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
या दोघांसोबत असलेल्या एका मित्राला पोहता येत नव्हते म्हणून तो पाण्यात उतरला नव्हता. त्यानेच याबाबत जलाशयालगतच्या लोकांना सांगितले. याबाबत अधिक तपास वाई पोलीस करत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 13th Mar 2016 रोजी प्रकाशित
जलाशयात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू
ही दोन्ही मुले अभियांञीकीचे विद्यार्थी होती.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 13-03-2016 at 15:06 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 youngsters drown in dhom